TRENDING:

Guess Who: 14 व्या वर्षी पळून जाऊन लग्न, 2 वर्षाने पतीचा मृत्यू; बनली 27 वर्ष मोठ्या नेत्याची दुसरी बायको, आज अभिनेत्री कोट्यवधीची मालकीण

Last Updated:
Guess Who: एक नाव असं आहे, जिच्या सौंदर्याची जितकी चर्चा झाली त्याहून कैक पटीने चर्चा झाली ती त्यांच्या खाजगी आयुष्याची.
advertisement
1/7
14व्या वर्षी लग्न,2 वर्षाने पतीचा मृत्यू;बनली 27वर्ष मोठ्या नेत्याची दुसरी बायको
मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आल्या ज्यांनी आपल्या पहिल्याच सिनेमानं इतिहास घडवला. पण एक नाव असं आहे, ज्याच्या सौंदर्याची जितकी चर्चा झाली त्याहून कैक पटीने चर्चा झाली ती त्यांच्या खाजगी आयुष्याची.
advertisement
2/7
वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारी ही सौंदर्याची खाण असणारी सुंदरी दुसरी कोणी नसून राधिका कुमारस्वामी आहे. राधिकाचं आयुष्य म्हणजे जणू एखाद्या हाय-व्होल्टेज ड्रामा असलेल्या सिनेमाची पटकथाच.
advertisement
3/7
राधिकाचा जन्म १९८६ मध्ये कर्नाटकात झाला. अवघ्या ९ वीत असताना तिने शिक्षणाला रामराम ठोकला आणि ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवलं. २००२ मध्ये तिचा 'निनागगी' हा पहिला सिनेमा सुपरहिट झाला. पण यशाच्या शिखरावर चढत असतानाच राधिकाच्या आयुष्यात पहिलं वादळ आलं. अवघ्या १३-१४ वर्षांची असताना राधिकाने उद्योगपती रतन कुमार यांच्याशी घरून पळून जाऊन मंदिरात गुपचूप लग्न उरकलं.
advertisement
4/7
हे लग्न राधिकाच्या घरच्यांना मान्य नव्हतं. तिचे वडील आणि पती यांच्यात कायदेशीर युद्ध सुरू झालं. वडिलांनी रतनवर अपहरण आणि फसवणुकीचे आरोप केले, तर रतनने सासऱ्यांवरच केस टाकली. मात्र, नियतीला काही वेगळंच मान्य होतं. अवघ्या दोन वर्षांत, २००२ मध्ये रतन कुमार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि राधिकावर ऐन तारुण्यात दुःखाचा डोंगर कोसळला.
advertisement
5/7
पहिल्या पतीच्या निधनानंतर राधिका पुन्हा सावरली आणि सिनेमात सक्रिय झाली. पण २००६ मध्ये तिच्या आयुष्यात असा ट्विस्ट आला ज्याने कर्नाटकचं राजकारण हादरलं. अवघ्या २० वर्षांच्या राधिकाने कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी गुपचूप लग्न केलं. त्यावेळी कुमारस्वामींचं वय ४७ वर्ष होतं, म्हणजेच दोघांमध्ये चक्क २७ वर्षांचं अंतर होतं.
advertisement
6/7
कुमारस्वामी यांचं हे दुसरं लग्न होतं, त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात ते अडकले. तब्बल चार वर्ष हे नातं जगापासून लपवून ठेवल्यानंतर २०१० मध्ये स्वतः राधिकाने या लग्नाचा खुलासा केला. त्यांना शमिका नावाची मुलगीही आहे. या लग्नामुळे कुमारस्वामींवर दोन लग्न केल्याचे आरोप झाले आणि कोर्टात खटलाही दाखल झाला.
advertisement
7/7
२०१५ मध्ये राधिका आणि कुमारस्वामी वेगळे झाले. कुमारस्वामी सध्या केंद्रीय मंत्री असून त्यांच्या अधिकृत पत्नी अनिता आहेत. मात्र, राधिका खचली नाही. तिने स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस 'शमिका एंटरप्रायझेस' सुरू केलं आणि चित्रपट निर्मितीत जम बसवला. २०२४ मध्ये ती 'भैरदेवी' या थ्रिलर सिनेमात झळकली होती. वादांच्या भोवऱ्यात असूनही राधिकाने स्वतःचं साम्राज्य उभं केलं असून आज तिची एकूण संपत्ती १२४ कोटी रुपये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: 14 व्या वर्षी पळून जाऊन लग्न, 2 वर्षाने पतीचा मृत्यू; बनली 27 वर्ष मोठ्या नेत्याची दुसरी बायको, आज अभिनेत्री कोट्यवधीची मालकीण
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल