Badmaash Restaurant : 400 रुपयांची भेळ, 350 रुपयांची कांदा भजी; मॉनी रॉयच्या रेस्टॉरंटमधील किंमती पाहून बसेल शॉक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mouni Roy Restaurant Badmaash : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने रेस्टॉरंट व्यवसायात पाऊल ठेवल्यापासून तिच्या 'बदमाश' या हॉटेलची चर्चा सुरू आहे. आता या रेस्टॉरंटमधील काही पदार्थांच्या किमती समोर आल्या असून, त्या पाहून चाहत्यांना भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
1/9

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने रेस्टॉरंट व्यवसायात पाऊल ठेवल्यापासून तिच्या 'बदमाश' या हॉटेलची चर्चा सुरू आहे. हे रेस्टॉरंट मुंबई आणि बंगळूरमध्ये असून, तेथील आलिशान डेकॉर आणि फ्युजन इंडियन फूडमुळे ते चर्चेत आहे.
advertisement
2/9
आता या रेस्टॉरंटमधील काही पदार्थांच्या किमती समोर आल्या असून, त्या पाहून चाहत्यांना भुवया उंचावल्या आहेत!
advertisement
3/9
मौनी रॉयने 'बदमाश' रेस्टॉरंट सुरू करण्यामागची प्रेरणा स्पष्ट केली आहे. ती म्हणाली, "मला भारतीय जेवण खूप आवडते. मी जेव्हा कामासाठी प्रवास करते, तेव्हा सगळीकडे इंडियन रेस्टॉरंट्स शोधत असते."
advertisement
4/9
"मला मनापासून वाटते की, आपल्याकडे, विशेषतः मुंबई आणि बंगळूरमध्ये, चांगल्या दर्जाचे इंडियन रेस्टॉरंट्स पुरेसे नाहीत. त्यामुळे 'बदमाश'सारखे काहीतरी सुरू करण्याची ही एक उत्तम संधी होती."
advertisement
5/9
ती पुढे म्हणाली, "मला कॅफे सुरू करायचा होता, पण माझे पती सूरज नांबियार आणि त्यांच्या मित्रांमुळे मला थेट रेस्टॉरंट सुरू करण्याची संधी मिळाली आणि मी लगेच ती स्वीकारली."
advertisement
6/9
'स्क्रीन'च्या एका रिपोर्टनुसार, 'बदमाश' रेस्टॉरंटमधील मेन्यूतील बहुतेक पदार्थांचे दर ३०० ते ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. मौनी रॉयच्या या हॉटेलमधील किमती सामान्य रेस्टॉरंटच्या तुलनेत खूपच जास्त आहेत.
advertisement
7/9
उदाहरणार्थ, अवोकॅडो भेळची किंमत ३९५ रुपये आहे. मौनी रॉयने 'इंडियन रिटेलर'ला सांगितले की, "मला अवोकॅडो आणि झालमुरी (भेळ) खूप आवडते, म्हणूनच आम्ही अवोकॅडो भेळ बनवली."
advertisement
8/9
शाही तुकडा आणि गुलाब जामून यांसारख्या डेझर्टची किंमत प्रत्येकी ४१० रुपये आहे. तंदूरी रोटीची किंमत १०५ रुपये, तर नानची किंमत ११५ रुपये आहे. कांदा भजी ३५५ रुपये, तर मसाला पापड, सेव पुरी यांसारखे स्नॅक्स प्रत्येकी २९५ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
9/9
२०२३ मध्ये 'बदमाश' सुरू करताना मौनीने आपला आनंद व्यक्त केला होता. तिने सांगितले होते की, मेनूमधील 'स्टिर-फ्राईड मशरूम मिलागू विथ शिमेजी क्रिस्प्स' हा तिचा आवडता पदार्थ आहे. तसेच, 'मौनी-लिशियस कॉकटेल' हे कढीपत्त्याच्या हलक्या चवीमुळे खास बनवले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Badmaash Restaurant : 400 रुपयांची भेळ, 350 रुपयांची कांदा भजी; मॉनी रॉयच्या रेस्टॉरंटमधील किंमती पाहून बसेल शॉक