TRENDING:

PMPML: पुणेकर महिलांनो, आज तिकीट काढायचं नाही! महिला दिनानिमित्त 'PMP'ची मोठी भेट; 'या' 31 मार्गांवर मोफत प्रवास

Last Updated:

आज, ८ मार्च रोजी शहरातील विविध ३१ मार्गांवर धावणाऱ्या 'महिला विशेष' बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आज, ८ मार्च रोजी शहरातील विविध ३१ मार्गांवर धावणाऱ्या 'महिला विशेष' बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी 'पीएमपी'ने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
पीएमपीची मोठी भेट (प्रतिकात्मक फोटो)
पीएमपीची मोठी भेट (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

कुठे आणि कशी मिळणार सवलत?

पीएमपीएल प्रशासन सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात ७६ महिला विशेष बस फेऱ्या चालवते. या सर्व फेऱ्यांमध्ये आज महिलांना विनातिकीट प्रवास करण्याची मुभा असेल. एकूण ३३ बसेसच्या माध्यमातून ही सेवा दिली जात असून, महिला प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Accident: भरधाव टेम्पो सिंहगड घाटातील 150 फूट खोल दरीत कोसळला; आतील चौघांनी मारल्या उड्या अन्...काळजाचा थरकाप उडवणारी घटना

advertisement

या मोफत प्रवासाच्या सुविधेत शहरातील महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे

स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर, कात्रज ते शिवाजीनगर, कात्रज ते कोथरुड डेपो.

हडपसर ते वारजे माळवाडी, भेकराईनगर ते मनपा भवन, हडपसर ते निगडी.

पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द, निगडी ते हिंजवडी (मेगा पॉलिस).

भोसरी ते चिंचवड गाव, शेवाळेवाडी ते कात्रज आणि मनपा भवन ते वाघोली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

या व्यतिरिक्त चिखली ते डांगे चौक आणि भोसरी ते हिंजवडी फेज ३ यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावरील महिला विशेष बसमध्येही ही सवलत लागू असेल. महिला दिनानिमित्त देण्यात आलेल्या या 'गिफ्ट'मुळे नोकरी आणि व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्या हजारो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठी बातम्या/पुणे/
PMPML: पुणेकर महिलांनो, आज तिकीट काढायचं नाही! महिला दिनानिमित्त 'PMP'ची मोठी भेट; 'या' 31 मार्गांवर मोफत प्रवास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल