Tanya Mittal ची मिमिक्री करणं अंगाशी आलं, जॉनी लिव्हरच्या लेकीने घेतला मोठा निर्णय! नेमकं काय म्हणाली जेमी?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Jamie Lever Big Decision: ख्रिसमसच्या आनंदाच्या वातावरणात जेमीने सोशल मीडियावर एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्याने तिचे चाहते पुरते हादरले आहेत.
advertisement
1/7

मुंबई: जेमी लीवर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो जॉनी लीवरचा वारसा जपणारा तिचा आनंदी चेहरा, तिचं ऊर्जावान व्यक्तिमत्त्व आणि कोणाचीही हुबेहूब नक्कल करून प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी तिची शैली.
advertisement
2/7
पण, जगाला हसवणाऱ्या या 'कॉमेडी क्वीन'च्या आयुष्यात सध्या काहीतरी बिनसलंय. ख्रिसमसच्या आनंदाच्या वातावरणात जेमीने सोशल मीडियावर एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्याने तिचे चाहते पुरते हादरले आहेत.
advertisement
3/7
जेमीने सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याची घोषणा केली असून, त्यामागील तिचं दुःख वाचून कोणाचंही मन हेलावून जाईल.
advertisement
4/7
काही दिवसांपूर्वी जेमीने 'बिग बॉस १९' ची स्पर्धक तान्या मित्तल हिची नक्कल करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. जेमीसाठी हा केवळ एक विनोद कंटेंट होता, पण नेटिझन्सना मात्र ते रुचलं नाही. अनेकांनी जेमीवर बॉडी शेमिंग केल्याचा आरोप केला. या टीकेचा ओघ इतका मोठा होता की, त्यामुळे जेमी मानसिकदृष्ट्या खचली.
advertisement
5/7
गुरुवारी, २५ डिसेंबर रोजी जेमीने इन्स्टाग्रामवर एक भावूक नोट लिहिली. ती म्हणते, "जे लोक मला जवळून ओळखतात, त्यांना माहिती आहे की मी माझ्या कामावर किती मनापासून प्रेम करते. लोकांना आनंद देण्याची ताकद दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. पण या प्रवासात मला एक गोष्ट समजली आहे, प्रत्येकजण तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार नाही किंवा तुमच्यासोबत हसणार नाही. अलीकडच्या काही घटनांनी मला असं जाणवून दिलंय की, मी स्वतःचा एक छोटासा भाग कुठेतरी हरवून बसले आहे. हा निर्णय मी रागात नाही, तर खूप विचार करून घेत आहे."
advertisement
6/7
तिने पुढे स्पष्ट केलं की, तिला तिचं काम खूप आवडतं आणि ती प्रेक्षकांचं मनोरंजन करणं थांबवणार नाही, पण सध्या तिला स्वतःला रीसेट करण्याची गरज आहे. तिने लिहिलं, "मी आता थोडा आराम करत आहे, पुढच्या वर्षी २०२६ मध्ये भेटूया!"
advertisement
7/7
जेमीची ही पोस्ट पाहून तिचे चाहते आणि मित्रमंडळी तिच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. एका चाहत्याने लिहिलं, "रडवणं सोपं असतं, पण कोणाला समजून घेऊन हसवणं ही मोठी गोष्ट आहे. तू रॉकस्टार आहेस!" तर दुसऱ्याने म्हटलं, "हा काळही निघून जाईल, तू 'लिमिटेड एडिशन' आहेस, खचून जाऊ नकोस."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tanya Mittal ची मिमिक्री करणं अंगाशी आलं, जॉनी लिव्हरच्या लेकीने घेतला मोठा निर्णय! नेमकं काय म्हणाली जेमी?