आधी OTT वर राडा आता थिएटर गाजवणार! Mirzapur The Movie ची रिलीज डेट समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Mirzapur The Movie Release Date : ओटीटीची टॉप वेब सीरिज मिर्झापूर आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'मिर्झापूर द मुव्ही'ची रिलीज डेट समोर आली आहे.
advertisement
1/8

ओटीटी </a>प्लॅटफॉर्म गाजवणाऱ्या काही सीरिजपैकी एक सीरिज म्हणजे मिर्झापूर. वेब सीरिजनंतर मिर्झापूर सिनेमाचीही घोषणा करण्यात आली. मिर्झापूर सिनेमा कधी रिलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं." width="1600" height="900" /> ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवणाऱ्या काही सीरिजपैकी एक सीरिज म्हणजे मिर्झापूर. वेब सीरिजनंतर मिर्झापूर सिनेमाचीही घोषणा करण्यात आली. मिर्झापूर सिनेमा कधी रिलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.
advertisement
2/8
आधी ओटीटी गाजवलं आणि आता मिर्झापूर द मुव्ही थिएटर गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सिनेमाची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
3/8
गुड्डू पंडित आणि कालीन भैया यांच्यातील वाद आता थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. भारतीय ओटीटीची सर्वात जुनी आणि सर्वात मोठी हिट फ्रँचायझी 'मिर्झापूर' आता त्याच्या शेवटच्या अध्यायासह मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
advertisement
4/8
दीर्घ प्रतीक्षेनंतर 'मिर्झापूर: द मूव्ही' ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. अमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंटने गुरुवारी सकाळी ऑफिशिअलरी रिलीज डेट जाहीर केली आहे.
advertisement
5/8
'मिर्झापूर: द मूव्ही' मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आवडत्या पात्रांमध्ये कलीन भैया (पंकज त्रिपाठी) आणि गुड्डू पंडित (अली फजल) यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. सिनेमात दिव्येंदु शर्माचा मुन्ना त्रिपाठी देखील परतणार आहे ज्याचा सीरिजमध्ये मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं.
advertisement
6/8
सिनेमात रवी किशन, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगावकर, हर्षिता गौर, सुशांत सिंग, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, कुलभूषण खरबंदा, सोनल चौहान, प्रमोद पाठक आणि अनंगशा बिस्वास असे तगडे कलाकार आहेत. पहिल्या सीझनमध्ये बबलू पंडितची भूमिका करणारा विक्रांत मेस्सी या सिनेमात दिसणार नाही. त्याच्या जागी जितेंद्र कुमार दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
advertisement
7/8
प्राइम व्हिडिओच्या क्राइम-थ्रिलर फ्रँचायझीमधील पहिला चित्रपट 'मिर्झापूर द मूव्ही' 4 सप्टेंबर 2026 रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे.
advertisement
8/8
पोस्टरमध्ये एसयूव्ही गाड्यांचा ताफा दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये सिनेमाचं टायटल आणि रिलीज डेट दिसतेय. अब देखिए भौकाल बड़े पर्दे पर #MirzapurTheMovie 4 सप्टेंबर रोजी तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये, असं म्हणत सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आधी OTT वर राडा आता थिएटर गाजवणार! Mirzapur The Movie ची रिलीज डेट समोर