TRENDING:

मराठी सिनेमाच्या इतिहासातील सगळ्यात क्रूर क्लायमॅक्स, 4 कोटी बजेट अन् 3 डिजिट कमाई

Last Updated:
आजवर अनेक सिनेमांच्या क्लायमॅक्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र असा एक मराठी सिनेमा ज्याचा क्लायमॅक्स पाहून प्रेक्षक हादरले होते. दहा वर्षांनीही हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
advertisement
1/10
मराठी सिनेमाच्या इतिहासातील सगळ्यात क्रूर क्लायमॅक्स, 4 Cr बजेट अन् 3 डिजिट कमाई
या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक मोठी खळबळ उडवून दिली. जातीभेद आणि त्याच्या नावाखाली झालेल्या गुन्ह्यांचे चित्रण अत्यंत वास्तववादी आणि हृदयद्रावक पद्धतीने केले गेलं. अवघ्या 4 कोटी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन डिजिट कमाई केली.
advertisement
2/10
हा कोणता साऊथ किंवा बॉलिवूडचा सिनेमा नसून मराठी सिनेमा आहे. या सिनेमाच्या नायिकेला तिच्या पहिल्याच चित्रपटात उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
advertisement
3/10
हा मराठी सिनेमा 2016 साली रिलीज झाला. आता या सिनेमाला 10 वर्ष झाली आहेत. मात्र सिनेमाची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. सिनेमा आजही प्रेक्षक तितक्याच आवडीनं पाहतात. सिनेमातील कलाकार, गाणी सगळं आजही तितकंच फेमस आहे.
advertisement
4/10
आपण बोलत आहोत तो सिनेमा म्हणजेच सैराट. नागराज मंजुळे दिग्दर्शित या सिनेमानं मराठी सिनेमा 100 कोटींच्या पार पोहोचवला. परश्या (आकाश ठोसर) हा एका मराठी गावातील मासेमार समुदायातील मुलगा आहे. आर्ची (रिंगू राजगुरू) ही त्याच गावातील एका राजकारण्याची मुलगी आहे. दोघे प्रेमात पडतात. जेव्हा आर्चीच्या कुटुंबाला त्यांचे प्रेम कळते तेव्हा एक मोठा वाद होतो. जाती आणि सामाजिक स्थितीमुळे ते वेगळे होतात. दोघेही धैर्याने गावातून पळून जातात आणि हैदराबादमध्ये आश्रय घेतात.
advertisement
5/10
'सैराट' म्हणजे 'जंगली' किंवा 'अनियमित'. शीर्षकाप्रमाणेच चित्रपटात समाज खऱ्या प्रेमाला कसा अन्याय करतो हे खोलवर दाखवले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे स्वतः चित्रपटाला दोन वेगवेगळ्या जगात विभागतात. चित्रपटाचा पहिला भाग एक ड्रिमलँड आहे. स्लो-मोशन सीन्स, सुंदर म्युझिक, रोमँटीक गाणी आहेत.
advertisement
6/10
दुसऱ्या भागात जेव्हा परशा आणि आर्ची हैदराबादला जातात तेव्हा चित्रपट बदलतो. ड्रिमलँड सोडून कथा वास्तवाशी जोडली जाते. एक श्रीमंत घरातील मुलगी शौचालयाच्या सुविधा नसलेल्या झोपडपट्टीत राहते. तिला भाषा न कळणाऱ्या शहरात जगण्यासाठी संघर्ष करणे.
advertisement
7/10
नागराज मंजुळेने साकारलेली स्त्री पात्र ही चित्रपटाची आणखी एक खासियत आहे. आर्ची भारतीय चित्रपटांमधील सामान्य नायिकांसारखी भित्री नाही. ती बुलेट चालवते, ट्रॅक्टर चालवते आणि पुरुषांसारखे बोलते. जेव्हा तिचा प्रियकर घाबरतो तेव्हा तीच त्याला घेऊन पळून जाते. घर सोडल्यानंतर तिचे लग्झरी आयुष्य गमावल्याचा पश्चात्ताप करूनही ती तिचा स्वाभिमान न सोडता कामावर जाते.
advertisement
8/10
त्याचप्रमाणे नागराज मंजुळे यांनी जातीच्या रचनेचे सूक्ष्म चित्रण हे चित्रपटाचा आणखी एक पैलू आहे. चित्रपटात असे कोणतेही स्पष्ट विधान नाही की मी या जातीचा आहे, तू त्या जातीचा आहेस. पण प्रत्येक सीन हे सांगत असतो.
advertisement
9/10
एक साधी प्रेमकथा म्हणून सुरुवात करून या चित्रपटाचा क्लायमॅक्स समाजाचा कुरूप चेहरा दाखवतो. सिनेमाचा क्लायमॅक्स अंगावर येणारा आहे. परशा आणि आर्चीच्या बाळावर सिनेमाचा शेवट होतो जो खरोखरच हृदयस्पर्शी आहे. रक्ताने माखलेले बाळाच्या पायाचे ठसे प्रेक्षकांना स्तब्ध करतात. चित्रपट संपल्यानंतरही प्रेक्षक खुर्ची सोडू शकत नाही हे या चित्रपटाचं सर्वात मोठं यश आहे.
advertisement
10/10
नागराज मंजुळे स्वतः एका शोषित समुदायातून आले आहेत त्यामुळे त्यांनी चित्रपटात ती वेदना इतक्या सुंदरपणे व्यक्त केली. या 2016 साली सैराटने तब्बल 110 कोटींची कमाई करत मराठी चित्रपटाच्या नावे रेकॉर्ड लिहिला जो आजवर कोणाला मोडता आलेला नाही. हा चित्रपट Zee5 OTT प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मराठी सिनेमाच्या इतिहासातील सगळ्यात क्रूर क्लायमॅक्स, 4 कोटी बजेट अन् 3 डिजिट कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल