TRENDING:

Election News: लाइट्स, कॅमेरा, राजकारण! निशा परुळेकरनंतर आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री निवडणुकीच्या रिंगणात

Last Updated:
Municipal Corporation Election: नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून, यंदाचा रणसंग्राम अधिक ग्लॅमरस होणार असल्याचं दिसतंय.
advertisement
1/9
निशा परुळेकरनंतर आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री निवडणुकीच्या रिंगणात
मालिकांच्या पडद्यावर प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भुरळ घालणारे चेहरे आता थेट जनसेवेसाठी रणांगणात उतरले आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून, यंदाचा रणसंग्राम अधिक ग्लॅमरस होणार असल्याचं दिसतंय.
advertisement
2/9
कारण, लोकप्रिय अभिनेत्री नुपूर सावजी हिने आता अभिनयाकडून राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला असून, ती भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे.
advertisement
3/9
'घाडगे अँड सून' मधील सून असो, 'तुला पाहते रे' मधील भूमिका असो वा 'रंग माझा वेगळा', नुपूरने आपल्या अभिनयाने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत स्थान मिळवलं आहे.
advertisement
4/9
केवळ टीव्हीच नाही, तर 'वाजलाच पाहिजे' सारखा चित्रपट आणि अनेक प्रायोगिक नाटकांतून तिने आपली छाप पाडली आहे. मात्र, मालिका-चित्रपटांमध्ये आपली चुणूक दाखवल्यानंतर आता नुपूर राजकारणात आपलं नशीब आजमावणार आहे.
advertisement
5/9
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नुकतीच नाशिकला भेट दिली. यावेळी त्यांनी नुपूर सावजी आणि त्यांच्या पॅनेलची भेट घेऊन विजयाचा विश्वास व्यक्त केला. "भाजपने यंदा अनेक तरुण आणि कर्तृत्ववान चेहऱ्यांना संधी दिली आहे, नुपूर त्यापैकीच एक आहे," असे उपाध्ये यावेळी म्हणाले.
advertisement
6/9
नुपूर ही केवळ एक अभिनेत्री नसून तिला राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. ती भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांची कन्या आहे. त्यामुळे राजकारणातील डावपेच तिच्यासाठी नवीन नाहीत.
advertisement
7/9
नुपूर नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ (क) मधून आपले नशीब आजमावत आहे. वडिलांचा दांडगा अनुभव आणि स्वतःची तरुण फॅन फॉलोइंग या जोरावर ती ही निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.
advertisement
8/9
नाशिक महापालिकेच्या ३१ वॉर्डमधील १२२ जागांसाठी यंदा जोरदार रस्सीखेच आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे, यातील सुमारे २० टक्के जागा राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये नुपूरचेही नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.
advertisement
9/9
केवळ नाशिकच नाही, तर मुंबईतही भाजपने अभिनेत्री निशा परुळेकर यांना रिंगणात उतरवले आहे. निशा यांनी 'या सुखांनो या' आणि 'रमाबाई भीमराव आंबेडकर' यांसारख्या कलाकृतींतून नाव कमावले आहे. यंदा महापालिकांच्या निवडणुकांमध्ये स्टार पॉवरचा मोठा प्रभाव पाहायला मिळणार हे नक्की.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Election News: लाइट्स, कॅमेरा, राजकारण! निशा परुळेकरनंतर आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री निवडणुकीच्या रिंगणात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल