TRENDING:

Nerves Health : डायबिटिक न्यूरोपथी म्हणजे काय ? शरीरावर काय परिणाम होतो ? जाणून घ्या सविस्तर माहिती

Last Updated:

नसा आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील भागांपैकी एक. तरीही, आपण त्यांच्या आरोग्याकडे क्वचितच लक्ष देतो. रक्तातली साखरेची पातळी वाढणं, हे मज्जातंतूंच्या नुकसानाचं एक प्रमुख कारण आहे, ज्याला वैद्यकीय भाषेत डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणतात. जाणून घेऊया नसांच्या आरोग्यावर याचा कसा परिणाम होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शरीराच्या आत जे काही घडतं बिघडतं त्याचे संकत आपल्याला मिळत असतात पण या चिन्हांकडे नीट लक्ष दिलं नाही तर ते महागात पडू शकतं.
News18
News18
advertisement

नसा आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील भागांपैकी एक. तरीही, आपण त्यांच्या आरोग्याकडे क्वचितच लक्ष देतो. रक्तातली साखरेची पातळी वाढणं, हे मज्जातंतूंच्या नुकसानाचं एक प्रमुख कारण आहे, ज्याला वैद्यकीय भाषेत डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणतात. जाणून घेऊया नसांच्या आरोग्यावर याचा कसा परिणाम होतो.

रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते तेव्हा नसांना पोषण देणाऱ्या लहान रक्तवाहिन्यांच्या भिंती कमकुवत होतात. शिवाय, वाढलेली साखर शिरांच्या संरक्षणात्मक आवरणांनाही नुकसान पोहचवतात.

advertisement

Eye Care : डोळे लाल होण्यामागे आहेत अनेक कारणं, अशी घ्या डोळ्यांची काळजी

मुंग्या येणं, सूज येणं, बधीर वाटणं किंवा हात आणि पायांमधे सुया टोचल्यासारखं वाटणं अशी लक्षणं सामान्यत: जाणवतात.

सूज - सूज ही शरीराची रोगप्रतिकारक प्रतिक्रिया आहे, पण सूज दीर्घकाळ टिकते तेव्हा ती एक समस्या बनू शकते. चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी, जंक फूड आणि ताणतणाव यामुळे शरीरात सायटोकिन्सची पातळी वाढू शकते. हे मज्जातंतूंच्या ऊतींवर हल्ला करतात, ज्यामुळे नसा सुजतात आणि सिग्नल पाठवण्याची त्यांची क्षमता गमावतात. क्रॉनिक इंफ्लेमेशन म्हणजेच सूज टाळण्यासाठी, आहारात हळद, आलं, ओमेगा-3 फॅटी एसिड आणि हिरव्या पालेभाज्या यांसारखे दाहक-विरोधी पदार्थ खाण्यावर भर द्या.

advertisement

व्हिटॅमिन बीची कमतरता - व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, विशेषतः बी1, बी6 आणि बी12, मज्जातंतूंच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. व्हिटॅमिन बी 12 मज्जातंतूंना व्यापणारा मायलिन थर तयार करण्यास मदत करते. हा थर  कमी जास्त झाला तर मज्जातंतूंचं नुकसान होऊ शकतं.

शाकाहारी आहार हे व्हिटॅमिन बीच्या कमतरतेचं सर्वात सामान्य कारण आहे. याव्यतिरिक्त, पचन समस्या किंवा काही औषधांमुळेही पोषक घटक चांगल्या प्रकारे शोषले जाऊ शकत नाहीत. यामुळे स्नायू कमकुवत होणं, स्मरणशक्ती कमी होणं आणि संतुलन राखण्यास असमर्थता म्हणजेच balance जाणं यासारख्या समस्या उद्भवू लागतात.

advertisement

Lungs Exercises : प्रदूषणात करा फुफ्फुसांचं रक्षण, पाच व्यायाम देतील बळकटी

हे धोके टाळण्यासाठी काय करायचं ?

नियमित चाचणी - मधुमेह असेल तर वर्षातून किमान दोनदा तुमची HbA1c चाचणी करा.

योग्य आहार - आहारातून प्रक्रिया केलेली साखर म्हणजेच प्रोसेस्ड शुगर आणि रिफाइंड कार्ब्स कमी करा. बी व्हिटॅमिनसाठी, अंडी, दुग्धजन्य पदार्थ आणि पूरक आहार घ्या. आहारातल्या बदलांआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

advertisement

व्यायाम - दररोज किमान तीस मिनिटं चालल्यानं रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे नसांना भरपूर ऑक्सिजन मिळतो.

ताण व्यवस्थापन - ध्यान आणि खोल श्वास घेण्याचे व्यायाम हे जुनी सूज कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील असंही हॉस्पिटल, मुलीचा जन्म झाल्यास घेतला जात नाही एकही रुपया
सर्व पहा

आहारातले, जीवनशैलीत बदल करताना मधुमेह तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Nerves Health : डायबिटिक न्यूरोपथी म्हणजे काय ? शरीरावर काय परिणाम होतो ? जाणून घ्या सविस्तर माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल