Eye Care : डोळे लाल का होतात ? जाणून घेऊयात कारणं, उपचारांविषयीची माहिती
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
शरीराचे सर्व भाग महत्त्वाचे आहेतच. त्यातल्या डोळ्यांच्या समस्यांबद्दलची ही माहिती. डोळे हे केवळ दृष्टीचं साधन नाहीत तर आपल्या आरोग्याचा आरसा आहेत. डोळ्यांमधे लालसरपणा किंवा जळजळ होण्याचा त्रास होत असेल तर ही माहिती नक्की वाचा.
मुंबई : एखादी व्यक्ती भेटली की बोलण्याची सुरुवात डोळ्यांकडे पाहून होते. डोळे हे आपलं प्रतिबिंब आहेत आणि जगाकडे पाहण्याची द्वारंही.
शरीराचे सर्व भाग महत्त्वाचे आहेतच. त्यातल्या डोळ्यांच्या समस्यांबद्दलची ही माहिती. डोळे हे केवळ दृष्टीचं साधन नाहीत तर आपल्या आरोग्याचा आरसा आहेत. डोळ्यांमधे लालसरपणा किंवा जळजळ होण्याचा त्रास होत असेल तर ही माहिती नक्की वाचा.
डोळे लाल होणं ही एक किरकोळ समस्या मानत असाल तर कधीकधी ते गंभीर समस्येचे संकेतही असू शकतात. ही समस्या केवळ थकवा किंवा झोपेच्या कमतरतेमुळे उद्भवत नाही; तर इतरही अनेक कारणं यामागे आहेत.
advertisement
डोळे लाल होण्याची कारणं -
झोपेचा अभाव आणि थकवा - मोबाईल, संगणक किंवा टीव्ही स्क्रीनसमोर बराच वेळ घालवणं यामुळेही डोळे लाल होऊ शकतात. रात्री उशिरापर्यंत जागं राहणं आणि पुरेशी झोप न घेणं डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतं. ज्यामुळे ते लाल आणि कमकुवत होऊ शकतात.
advertisement
धूळ आणि धूर - हे डोळ्यांचे सर्वात मोठे शत्रू आहेत. ऍलर्जीमुळे डोळ्यांना खाज सुटणं, जळजळ होणं आणि लालसरपणा येऊ शकतो. लोक सहसा याकडे दुर्लक्ष करतात, पण सततच्या ऍलर्जीमुळे दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो.
कोरडे डोळे - कामाच्या ठिकाणी किंवा घरी, सतत स्क्रीनसमोर किंवा हीटरजवळ बसल्यानं डोळे कोरडे आणि लाल होऊ शकतात. यामुळे डोळ्यांत जळजळ होणं, सूज येणं आणि डोळ्यांमधून पाणी येण्याचा धोका वाढू शकतो.
advertisement
संसर्ग - वारंवार कॉन्टॅक्ट लेन्स घालत असाल तर घाण, बॅक्टेरिया किंवा विषाणूंमुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात दाह होऊ शकतो. तसंच डोळ्यांना तीव्र जळजळ, पाणी येणं असेही प्रकार होतात.
डोळ्यांच्या समस्यांवर उपाय पाहूया -
पुरेशी झोप घ्या - डोळ्यांच्या आरोग्यासाठी दिवसातून सात-आठ तास झोप घेणं आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे डोळ्यांमधील रक्तवाहिन्यांना सूज येऊ शकते, ज्यामुळे लालसरपणा वाढतो.
advertisement
थंड पाणी वापरा - डोळे सुजले असतील आणि जळजळ झाली असेल तर दिवसातून दोन-तीन वेळा थंड पाण्यानं डोळे स्वच्छ धुवा किंवा त्यांना आराम देण्यासाठी आईस पॅक लावा.
आय ड्रॉप्स वापरून पहा - डोळे कोरडे असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टियर ड्रॉप्स वापरा. यामुळे डोळे ओले ठेवण्यासाठी आणि लालसरपणा कमी करण्यासाठी मदत होते.
advertisement
डोळ्यांना हळूवारपणे मालिश करा - डोळ्यांत सतत वेदना, जळजळ किंवा जडपणा जाणवत असेल तर डोळ्यांना हळूवारपणे मालिश करा. यामुळे खूप आराम मिळेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 1:02 PM IST









