Walking : नवीन वर्षात चालण्याचा व्यायाम नक्की करा, साध्या सोप्या व्यायामानं तब्येत राहिल ठणठणीत
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
नवीन वर्षाचा उत्साह आता कमी होईल पण जिममधे जाण्याचा संकल्प अपयशी ठरत असेल तर काळजी करू नका. तंदुरुस्त राहण्यासाठी नेहमीच व्यायाम किंवा जिमची आवश्यकता नसते. पण अर्धा तास चालणं पुरेसं आहे. पाहूयात अर्धा तास चालण्याचे फायदे.
मुंबई : नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी अनेक संकल्प केले जातात. पण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा उत्साह टिकतो. पण काही काळानं ही आश्वासनं अनेकदा मागे पडतात.
निरोगी राहण्यासाठी जिममधे जाणं किंवा व्यायाम करणं हे संकल्प फार दिवस टिकत नाहीत. नवीन वर्षाचा उत्साह आता कमी होईल पण जिममधे जाण्याचा संकल्प अपयशी ठरत असेल तर काळजी करू नका. तंदुरुस्त राहण्यासाठी नेहमीच व्यायाम किंवा जिमची आवश्यकता नसते. पण अर्धा तास चालणं पुरेसं आहे. पाहूयात अर्धा तास चालण्याचे फायदे.
advertisement
व्यायाम नेहमीच कठीण असतो पण ही मानसिकता आपल्याला बदलण्याची गरज आहे. साधं चालणंही शरीरासाठी खूप फायदेशीर ठरु शकतं. हृदयरोग हे जगभरातील मृत्यूचं एक प्रमुख कारण आहे. दिवसातून तीस मिनिटं चालल्यानंही हृदयरोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. हृदय मजबूत करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
सांध्यांचं आरोग्य - बराच वेळ बसून काम केल्यानं अनेकदा सांध्यांमधे कडकपणा येतो. दररोज चालल्यानं सांध्यांची लवचिकता टिकून राहण्यास मदत होते. वयानुसार येणाऱ्या संधिवात आणि हालचालीसंबंधित समस्या टाळणं यामुळे शक्य होऊ शकतं.
advertisement
कर्करोगाचा धोका कमी करायला मदत होते - चालण्यामुळे केवळ वजन कमी होण्यास मदत होतेच, पण यामुळे जीवघेण्या आजारांपासून देखील संरक्षण होतं. चालण्यामुळे आतडं, स्तन आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. सुदैवानं, यासाठी दररोज दहा हजार पावलं चालण्याची गरज नाही.
advertisement
इम्युनिटी बूस्टर - चालण्यामुळे शरीरातील सूज कमी होते, रक्ताभिसरण सुधारतं आणि ताण कमी होतो.
या सर्व गोष्टींमधे सुधारणा केल्यानं झोप सुधारते आणि शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.
मानसिक आरोग्यासाठी वरदान - दररोज चालणं हे शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्यामुळे ताणतणाव किंवा चिंता वाटत असेल तर फिरायला जा. चालण्यामुळे शरीरात 'फील गुड' हार्मोन्स बाहेर पडतात. यामुळे मूड चांगला राहतो आणि यामुळे मानसिक शांती मिळते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 8:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Walking : नवीन वर्षात चालण्याचा व्यायाम नक्की करा, साध्या सोप्या व्यायामानं तब्येत राहिल ठणठणीत








