Urine Infection : हिवाळ्यात का वाढतो मूत्रमार्ग संसर्गाचा धोका ? काळजी कशी घ्यायची ?
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
संधिवात, श्वसनाचे त्रास याबरोबरच हिवाळ्यात मूत्रमार्गाचा संसर्ग म्हणजेच Urinary Track Infection होण्याचं प्रमाण देखील जास्त आहे. काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर हा संसर्ग टाळता येऊ शकतो.
मुंबई : डिसेंबर - जानेवारी म्हणजे थंडीचा हमखास मुक्काम. आल्हाददायक हवामान आणि थंड वाऱ्यामुळे हिवाळा हा ऋतू अनेक प्रकारे खास आहे. पण हा ऋतू अनेक समस्या देखील घेऊन येतो. या काळात संधिवात, हृदयरोग, श्वसनाच्या समस्या आणि त्वचेचे आजार वाढतात.
संधिवात, श्वसनाचे त्रास याबरोबरच हिवाळ्यात मूत्रमार्गाचा संसर्ग म्हणजेच Urinary Track Infection होण्याचं प्रमाण देखील जास्त आहे. काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर हा संसर्ग टाळता येऊ शकतो.
हिवाळ्यात यूटीआयचा धोका वाढतो कारण थंडीमुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो आणि शरीराच्या ज्या भागात थंडी जाणवत नाही अशा भागात जास्त रक्तपुरवठा होतो, ज्यामुळे शरीराचं तापमान कमी होतं आणि शरीर उबदार राहतं.
advertisement
तसंच, थंडीच्या गारव्यामुळे जास्त तहान लागली नसली तरी ते आवश्यक प्रमाणात पाणी पित नाहीत, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि यूटीआयचा धोका देखील वाढतो.
UTI चा धोका कसा टाळता येईल ?
- दररोज दहा ग्लास पाणी प्या: हिवाळ्यात UTI टाळण्यासाठी, भरपूर पाणी प्या. डिहायड्रेशनमुळे यूटीआयचा धोका वाढू शकतो. यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी, दिवसभरात किमान दहा ग्लास पाणी प्या.
advertisement
- जास्त वेळ लघवी रोखून ठेवू नका: मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी, जास्त वेळ लघवी रोखून न ठेवणं महत्वाचं आहे. लघवीची तीव्र इच्छा होताच लघवी करा.
- वैयक्तिक स्वच्छता : मूत्रमार्गाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी चांगली वैयक्तिक स्वच्छता राखणं आवश्यक आहे. म्हणून, चांगली वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी, शौचालय वापरल्यानंतर खाजगी भाग पूर्णपणे स्वच्छ करा.
advertisement
- सुती अंतर्वस्त्र : सुती अंतर्वस्त्र घालणं आवश्यक आहे. यामुळे जननेंद्रियाचा भाग कोरडा राहण्यास मदत होते. त्या भागात जास्त ओलावा असल्यानं बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो.
- आहारात व्हिटॅमिन सीचा समावेश करा: व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि लघवीची आम्लता वाढते, ज्यामुळे संसर्ग निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. संत्री, किवी, आणि द्राक्षं खा.
advertisement
- क्रॅनबेरी खा: मूत्रमार्ग संसर्गावर हे औषध नाही पण या फळातील प्रोअँथोसायनिडिन नावाच्या रासायनिक घटकामुळे ई. कोलाय बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोग होतो. ज्यामुळे संसर्गाची शक्यता कमी होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 8:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Urine Infection : हिवाळ्यात का वाढतो मूत्रमार्ग संसर्गाचा धोका ? काळजी कशी घ्यायची ?











