Makar Sankranti 2026 : संक्रांत म्हणजे संकट; मग मकरसंक्रांती का साजरी करतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Why Makar Sankranti Celebrated : संक्रांत हा शब्द संकटाशी, वाईट काळाशी जोडला जातो. त्यामुळे संक्रात जर वाईट असेल तर मग मकरसंक्रांती इतक्या उत्साहात, आनंदात साजरा का केला जातो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
खगोलशास्त्रानुसार संक्रांत म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो दिवस. वर्षात अशा एकूण 12 संक्रांती येतात. पण सगळ्या संक्रांती साजऱ्या केल्या जात नाहीत, त्यादिवशी दानधर्म, संयम आणि साधेपणावर भर दिला जातो. पण मकरसंक्रांत इतर संक्रांतींपेक्षा वेगळी आणि विशेष मानली जाते कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होतं.
advertisement
advertisement
advertisement
संक्रांत आणि संकट हे दोन वेगळे शब्द आहेत. संक्रांत हा शब्द संस्कृतमधील संक्रमण या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ बदल, संक्रमण, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं. संकट म्हणजे त्रास, अडचण, संकटाचा काळ. मराठीत उच्चार साधर्म्यामुळे या दोन शब्दांचा अर्थ गोंधळात टाकला गेला आणि संक्रांत म्हणजे संकट अशी समजूत रूढ झाली.
advertisement
खगोल अभ्यासक आणि पंचागकर्ते दा. कृ. सोमण सांगतात, संक्रांतीने संकरासुर राक्षसाला ठार मारलं आणि दुसऱ्या दिवशी संक्रांतीदेवीने किंकरासुर राक्षसाला ठार मारलं असे प्राचीन कथेत सांगितलं गेलं आहे. संक्रांती देवीने जर राक्षसांना ठार मारलं तर ते वाईट कसं असेल? ही तर चांगलीच गोष्ट आहे. संक्रांत ही वाईट असते, अशुभ असते हा एक गैरसमज आहे. दिनमान वाढत जाणं हे वाईट आणि अशुभ कसं असू शकेल उलट ती एक चांगली, शुभ, आनंदाचीच गोष्ट आहे. त्यामुळे चांगली गोष्ट झाली त्यावेळीच संक्रांत आली असं म्हटलं पाहिजे.
advertisement








