'माझं घर गेलं...', आगीत जळून खाक झालं मराठमोळ्या अभिनेत्याचं घर, समोर आले काळीज चिरणारे PHOTO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Pushkar Jog House Fire: मुंबईतील ज्या इमारतीत पुष्कर राहतो, तिथे अचानक भीषण आग लागली. परिस्थिती इतकी बिकट होती की, धुराच्या लोटात पुष्कर आणि त्याची लहान मुलगी घरातच अडकून पडले.
advertisement
1/9

मुंबई: आज संपूर्ण जग ख्रिसमसच्या रंगात न्हाऊन निघालं आहे. सगळीकडे रोषणाई, ख्रिसमस ट्री आणि केकचा सुगंध दरवळतोय. पण याच आनंदाच्या दिवशी मराठमोळा अभिनेता पुष्कर जोग आणि त्याच्या कुटुंबासोबत एक भयंकर घटना घडली आहे.
advertisement
2/9
मुंबईतील ज्या इमारतीत पुष्कर राहतो, तिथे अचानक भीषण आग लागली. परिस्थिती इतकी बिकट होती की, धुराच्या लोटात पुष्कर आणि त्याची लहान मुलगी घरातच अडकून पडले. थरकाप उडवणाऱ्या या घटनेनंतर पुष्करने सोशल मीडियाचा आधार घेत दिलेली आर्त हाक पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
advertisement
3/9
सण साजरा करण्याच्या तयारीत असतानाच अचानक इमारतीत आगीचा भडका उडाला. बाहेर पडण्याचे रस्ते धुराने काळवंडले होते. अशा स्थितीत घाबरलेल्या पुष्करने तातडीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट टाकली.
advertisement
4/9
त्याने लिहिलं, "माझ्या बिल्डिंगला आग लागली आहे. मी आणि माझी मुलगी घरात अडकलो आहोत. सर्वत्र आग पसरली आहे, कृपया आम्हाला मदत करा!" त्याची ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच मदतीसाठी यंत्रणा हलल्या.
advertisement
5/9
सुदैवाने, मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी वेळेत पोहोचले आणि त्यांनी पुष्कर व त्याच्या मुलीला सुखरूप बाहेर काढलं.
advertisement
6/9
सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर पुष्करने आपल्या घराची अवस्था दाखवणारा एक हृदयद्रावक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, आगीने घराचं मोठं नुकसान केलं आहे. घराची बाल्कनी पूर्णपणे जळून कोळसा झाली आहे, भिंती काळवंडल्या आहेत.
advertisement
7/9
हा व्हिडीओ शेअर करताना पुष्करने अत्यंत भावूक होऊन लिहिलं, "माझं घर गेलं... पण आम्हाला वाचवल्याबद्दल खऱ्या हिरोंचे फायर फायटर्स, मुंबई पोलीस आणि बीएमसीचे मनापासून आभार." पुष्करच्या हसत्या खेळत्या घराला अशा अवस्थेत पाहताना सर्वांनाच दुःख होत आहे.
advertisement
8/9
पुष्करच्या या पोस्टवर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. अनेकांनी ही घटना कशी घडली याबाबत विचारणा केली आहे, तर काहींनी पुष्कर आणि त्याच्या कुटुंबियांना काळजी घेण्यास सांगितले आहे.
advertisement
9/9
तथापि, आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझं घर गेलं...', आगीत जळून खाक झालं मराठमोळ्या अभिनेत्याचं घर, समोर आले काळीज चिरणारे PHOTO