TRENDING:

नाना पाटेकरांची बायकोही आहे अभिनेत्री, 47 वर्षांआधी फक्त 750 रुपयांत केलं होतं लग्न; पण राहतात वेगळे

Last Updated:
अभिनेते नाना पाटेकर यांची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांच्या लग्नाला 47 वर्ष झाली आहेत. मात्र आजही ते वेगळे राहतात.
advertisement
1/9
नाना पाटेकरांची बायकोही आहे अभिनेत्री, 47 वर्षांआधी फक्त 750 रुपयांत केलं होतं
मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर. केवळ अभिनय नाही तर राजकीय आणि सामाजिक विषयांमध्येही नाना पाटेकरांचा हातखंड आहे. नानांनी त्याच्या आतापर्यंतच्या अभिनय कारकीर्दीत अनेक हिट सिनेमांत काम केलं आहे.
advertisement
2/9
वयाच्या सत्तरीतही ते काम करत आहेत. नानांचं ऑनस्क्रिन आयुष्य नेहमीच हिट राहिलं पण त्यांच्या ऑफस्क्रिन आयुष्याबद्दल खूप कमी जणांनी माहिती आहे. आज लाखो रुपये खर्च करून लोक लग्न करतात. पण नानांनी मात्र केवळ 750 रुपये खर्च करून लग्न केलं होतं. कोण आहे नाना पाटेकरांची बायको? काय करते पाहूयात.
advertisement
3/9
अभिनेते नाना पाटेकर आज त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 साली रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिरा येथे झाला. नानांच्या बायकोचं नाव नीलकांती पाटेकर. त्या देखील मराठीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. नानांनी लग्न केलं तेव्हा त्यांचा पगार फक्त 50 रुपये होता.
advertisement
4/9
नानांची सुरुवात ही नाटकांपासून झाला. नाटकात काम करताना नानांची भेट नीलकांती यांच्याशी झाली. नीलकांती या अभिनेत्री होण्याबरोबर लेखिका देखील आहेत.
advertisement
5/9
एका मुलाखतीत बोलताना नानांनी त्यांच्या बायकोचं भरभरून कौतुक केलं होतं. ते म्हणाले होते, "नीलू एका बँकेत ऑफिसर होती. महिन्याला 2500 रुपये कमावायची. मला तेव्हा एका शोचे 50 रुपये मिळायचे. मी महिन्यात 15 प्रयोग केले तर माझी महिन्याची कमाई 750 रुपये व्हायची. माझी आणि नीलूची कमाई मिळून 3250 रुपये व्हायची. जी गरजेपेक्षा जास्त होती."
advertisement
6/9
नाना आणि नीलकांती यांनी 1978 साली लग्न केलं. नानांनी सांगितलं होतं, "त्या काळात 200 रुपयात रेशन यायचं त्यामुळे आमचे पैसे वाचायचे. आम्ही फक्त 750 रुपयांत लग्न केलं होतं. आमच्याकडे 24 रुपये वाचले होते त्यात आम्ही गोल्डस्पॉट्स खरेदी केली आणि पाहुण्यांना छोटीशी पार्टी दिली होती."
advertisement
7/9
नाना आणि नीलकांती यांना दोन मुलं होती. त्यातील एका मुलाचा मृत्यू झाला. त्यांचा दुसरा मुलगा मल्हार पाटेकर त्यांच्याबरोबर आहे.
advertisement
8/9
नाना आणि नीलकांती पाटेकर अनेक वर्ष एकत्र राहत नाही. त्यांचा डिवोर्स झालेला नाही पण अनेक वर्ष ते एकमेकांपासून दूर राहतात.
advertisement
9/9
नीलकांती पाटेकर या सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्ये काम करतात. काही वर्षांआधी त्यांची गोठ ही मराठी मालिका खूप लोकप्रिय झाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नाना पाटेकरांची बायकोही आहे अभिनेत्री, 47 वर्षांआधी फक्त 750 रुपयांत केलं होतं लग्न; पण राहतात वेगळे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल