TRENDING:

Blood Pressure : घरी BP चेक करताय सांभाळून! ब्लड प्रेशरवर होतोय मोठा परिणाम, नागपूरच्या डॉक्टरांनी केलं सावध

Last Updated:
BP Check At Home : अनेकांच्या घरी बीपी मशीन आहे, ज्यात ते ब्लड प्रेशर चेक करतात. पण एक साधी छोटीशी चूकही रक्तदाबावर परिणाम करू शकते, डॉक्टरांनी याबाबत सावध केलं आहे.
advertisement
1/7
घरी BP चेक करताय सांभाळून! होतोय मोठा परिणाम, नागपूरच्या डॉक्टरांनी केलं सावध
ब्लड प्रेशर ही समस्या हल्ली सामान्य झाली आहे. कित्येकांना रक्तदाबाचा त्रास आहे, कुणाला लो बीपी तर कुणाला हाय बीपी आहे. इतर काही कारणांमुळेही बीपी हाय-लो होत असतो. त्यामुळे आता घरीच बीपी तपासण्याच्या मशीन्स उपलब्ध आहेत. बहुतेक लोकांच्या घरात बीपीची मशीन आहे. त्यावरच लोक आपला बीपी चेक करतात. पण घरी बीपी चेक करताना सांभाळूनच एक छोटीशी चूकही बीपीवर परिणाम करू शकते, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
2/7
घरी बीपी तपासताना अचानक रिडींग बदलत राहतं. कधी अचानक एकदम हाय येतं किंवा एकदम लो. मग बीपीच्या पेशंटना प्रश्न पडतो की आता औषधं कमी करायची, वाढवायची की बदलायची? तर डॉक्टरांच्या मते समस्या औषधांची नाही तर बीपी मोजण्याच्या पद्धतीत आहे, बीपी मोजण्याची पद्धत चुकीची असू शकते.
advertisement
3/7
बीपी मोजताना छोट्या छोट्या चुकाही रिडींगवर परिणाम करतात. ज्यामुळे बीपी हाय किंवा लो दिसू शकतो. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार 20-30 पाईंट्सने तो बदलू शकतो. या चुका कोणत्या त्या पाहुयात.
advertisement
4/7
पहिली चूक म्हणजे हातांची स्थिती. बीपी मोजताना हात एकदम खाली किंवा वर ठेवू नये, तर तो सामान्य पातळीवर असावा. एखाद्या टेबलवर हात ठेवा, जो हृदयाच्या सरळ रेषेत असावा. अशा पद्धतीने बीपी मोजावा.
advertisement
5/7
दुसरी चूक म्हणजे बीपी मोजण्याआधी 5-10 मिनिटं शांत बसा. चालत आल्या आल्या लगेच किंवा बोलताना बीपी घेतला तर हृदयाची गती वाढलेली असते, नर्व्हस अॅक्टिव्ह असतात आणि बीपी वाढलेला दाखवतो. त्यामुळे बीपी तपासण्याआधी पाय जमिनीवर ठेवा, पाठ भिंतीला टेकवून शांत बसा.
advertisement
6/7
तिसरी चूक म्हणजे बीपी मोजण्याच्या मशीनची कफ साइझ. लहान कफ असेल तर बीपी जास्त दाखवतो आणि खूप मोठा किंवा सैल कफ असेल तर बीपी कमी दाखवतो. म्हणून कफ हातावर नीट बसायला हवा. कफवर असलेला इंडेक्स मार्क्स बरोबर धमनीवर यायला हवा. कपडे घालून बीपी कधीच चेक करू नका.
advertisement
7/7
चुकीच्या रीडिंगमुळे अनावश्यक औषध वाढ होते. त्यामुळे औषधं वाढवण्याआधी तपासण्याची पद्धत चेक करा, असा सल्ला नागपूचे यांनी दिला आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Blood Pressure : घरी BP चेक करताय सांभाळून! ब्लड प्रेशरवर होतोय मोठा परिणाम, नागपूरच्या डॉक्टरांनी केलं सावध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल