Neena Gupta: कोणत्या कारणासाठी नीना गुप्ता यांना घालावी लागली होती पॅडेड ब्रा, अभिनेत्रीने सांगितला 'चोली के पीछे' चा धक्कादायक किस्सा
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
1993 साली रिलीज झालेल्या 'खलनायक' चित्रपटातलं सुपरहिट गाणं 'चोली के पिछे क्या है' नक्कीच ऐकलं असेल. अनेकदा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये किंवा बर्थडे पार्ट्यांमध्ये हे गाणं हमखास वाजतंच. इतक्या वर्षांपासून सुपरहिट ठरलेल्या ह्या गाण्याला आजही चाहते पसंद करतायत. या गाण्याची अजूनही काही फॅन फॉलोविंग काही कमी झालेली नाही. या गाण्याविषयी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी चित्रपटाच्या शुटिंग वेळी सुभाष घईंनी केलेल्या एका मागणीवर भाष्य केलं आहे.
advertisement
1/6

1993 साली रिलीज झालेल्या 'खलनायक' चित्रपटातलं सुपरहिट गाणं 'चोली के पिछे क्या है' नक्कीच ऐकलं असेल. अनेकदा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये किंवा बर्थडे पार्ट्यांमध्ये हे गाणं हमखास वाजतंच. इतक्या वर्षांपासून सुपरहिट ठरलेल्या ह्या गाण्याला आजही चाहते पसंद करतायत. या गाण्याची अजूनही काही फॅन फॉलोविंग काही कमी झालेली नाही. 'चोली के पिछे क्या है' गाण्यामध्ये माधुरीच्या ऐवजी नीना गुप्ता यांनी परफॉर्मन्स केला होता.
advertisement
2/6
'चोली के पिछे क्या है' या हिट गाण्याने नीना गुप्ता यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. अलीकडेच अभिनेत्रीने गाण्याविषयी महत्त्वाचं विधान केलं आहे. शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये, दिग्दर्शक सुभाष घई यांनी केलेल्या एका विचित्र मागणीबद्दल नीना गुप्ता म्हणाल्या की, " 'चोली के पिछे क्या है' गाण्याच्या शुटिंग वेळी सुभाष घईंनी मला एका सीनसाठी पॅडेड ब्रा घालाण्यासाठी सांगितली होती. दिग्दर्शकांनी कॉस्च्युम डिझायनरला सांगितलं की, "इसे थोडा और भरा- भरा दिखाओ".
advertisement
3/6
"डायरेक्टरने केलेल्या या वक्तव्याचा मला खरोरखर राग आला होता, पण मी नंतर विचार केला की, हा असा कसा विचार करू शकतो? किती घाणेरडा आहे.", अशी प्रतिक्रिया नीना यांनी दिली. नीना पुढे म्हणाल्या की, "मी आता या घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. पण आता मला वाटते की तो फक्त त्याचे काम करत होता."
advertisement
4/6
"त्या गाण्यातलं कॅरेक्टरच तसं होतं. डायरेक्टरच्या मनात त्या गाण्यातल्या कॅरेक्टरसाठी वेगळी इमेज होती. तो ती स्पष्टपणे व्यक्त करत होता. तो माझ्याकडे पाहत नव्हता, पण मी तेव्हा नवीन होते. आज, मला ते वेगळ्या पद्धतीने समजते. काही काळ मला त्याचा त्रास झाला, पण नंतर ते गाणे इतके सुंदर होते की मी ते विसरून गेले."
advertisement
5/6
1993 मध्ये, रिलीज झालेल्या 'खलनायक' या क्राईम अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात संजय दत्तने मुख्य भूमिका साकारली होती. माधुरी दीक्षित, अनुपम खेर, राखी गुलजार आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार सुद्धा मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. शिवाय, प्रेक्षकांनीही चित्रपटाला पॉझिटिव्ह रिसपॉन्स दिला होता.
advertisement
6/6
1993 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट होता. "खल नायक हूं मैं", "चोली के पीचे क्या है," आणि "पलकी पे हो के" सारख्या गाण्यांचा समावेश असलेला चित्रपटाचा साउंडट्रॅक देखील खूप हिट झाला. "चोली के पीचे क्या है" अल्का याग्निक आणि इला अरुण यांनी गायले होते आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते. हे गाणे आजही लोकप्रिय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Neena Gupta: कोणत्या कारणासाठी नीना गुप्ता यांना घालावी लागली होती पॅडेड ब्रा, अभिनेत्रीने सांगितला 'चोली के पीछे' चा धक्कादायक किस्सा