Netflix वरील 6 एपिसोडची मिस्ट्री थ्रिलर सीरिज, रिलीज होताच OTT वर उडवली खळबळ
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Netflix Mystery Thriller Series: नेटफ्लिक्सवर नुकत्याच रिलीज झालेल्या एका मिस्ट्री थ्रिलर वेबसीरिजची वेबविश्वात खळबळ उडवली आहे.
advertisement
1/7

नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक भन्नाट चित्रपट आणि सीरिज उपलब्ध आहेत. पण या सगळ्यात नेटफ्लिक्सवर एक अशी वेब सीरिज आहे जिची कथा तुमचं डोकं अक्षरशः फिरवून टाकेल. ही एक जबरदस्त मिस्ट्री-थ्रिलर सीरिज आहे. नुकतीच ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे.
advertisement
2/7
His & Hers असं या सीरिजचं नाव आहे. ही सीरिज एलिस फीनी यांच्या 2020 मधील 'हिड अँड हर्स' या बेस्टसेलर कादंबरीवर आधारित आहे. रिलीज होताच ही सीरीज टॉप 10 मध्ये सामील झाली आहे.
advertisement
3/7
His & Hers ही एक उत्कृष्ट मर्डर मिस्ट्री सीरिज आहे. या सीरिजची कथा एका पती-पत्नीभोवती फिरते. यात टेसा थॉम्पसन अॅना अँड्र्यूजच्या भूमिकेत दिसते, जी एक न्यूज रिपोर्टर आहे आणि आपल्या गावात झालेल्या एका खुनाचा तपास करते. तर जॉन बर्नथल जॅक हार्पर या डिटेक्टिव्हच्या भूमिकेत आहे, जो त्या खुनाचा तपास करत आहे.
advertisement
4/7
दोघांचाही दृष्टिकोन वेगवेगळा आहे. अनेकदा ते एकमेकांवर संशयही घेतात. त्यामुळे ही सीरीज दोघांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दाखवण्यात आली आहे. जे खूप वेगळं आणि विशेष वाटतं.
advertisement
5/7
6 भागांच्या या सीरिजमध्ये सत्याचे वेगवेगळे पैलू समोर येतात. प्रत्येक भाग तुम्हाला स्क्रीनला खिळवून ठेवतो. यातील सस्पेन्स इतका जबरदस्त आहे की शेवटपर्यंत खुनी कोण आहे, हे कुणालाही ओळखता येत नाही.
advertisement
6/7
His & Hers या सीरिजमध्ये टेसा थॉम्पसन मुख्य भूमिकेत आहे. तिचं पात्र प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. थॉम्पसनने अशा एका स्त्रीचं पात्र साकारलं आहे, जी आपल्या भूतकाळातील आघातांशी झुंज देत आहे. तिचं पात्र कायम प्रेक्षकांना गुंतवून ठेवतं.
advertisement
7/7
दुसरीकडे, जॉन बर्नथल जॅक नावाच्या डिटेक्टिव्हच्या भूमिकेत दिसतो. दोघांची जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Netflix वरील 6 एपिसोडची मिस्ट्री थ्रिलर सीरिज, रिलीज होताच OTT वर उडवली खळबळ