TRENDING:

Dhurandhar 2 मध्ये नवे चेहरे अन् स्पेशल कॅमिओ, कोण घेणार एन्ट्री आणि कोणाचा पत्ता कट? Full Cast लिस्ट आली समोर

Last Updated:
Dhurandhar 2 Full Cast: पहिल्या भागातील प्रत्येक कलाकाराचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. अशातच दुसऱ्या भागात कोणते नवे कलाकार पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
advertisement
1/13
Dhurandhar2 मध्ये नवे चेहरे अन् स्पेशल कॅमिओ,कोणाची एन्ट्री आणि कोणाचा पत्ता कट?
आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या याच्या दुसऱ्या भागाकडे, म्हणजेच Dhurandhar: The Revenge कडे. १९ मार्च रोजी सिनेमाचा दुसरा भाग रिलीज होणार असून ट्रेलरने आधीच प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. दुसऱ्या भागामध्ये अॅक्शन आणि सस्पेन्स भरभरून असणार यात शंका नाही.
advertisement
2/13
पहिल्या भागातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं. प्रेक्षकांनी चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे. अशातच दुसऱ्या भागात कोणते नवे कलाकार पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
advertisement
3/13
या वेळेस रहमन डकैतची काही जुनी माणसं आपल्याला पुन्हा पडद्यावर दिसणार नाहीत. कथानकानुसार या ५ पात्रांचा अंत पहिल्या भागात झाल्यामुळे सिक्वेलमध्ये त्यांची एक्झिट निश्चित झाली आहे.
advertisement
4/13
१. डोंगा (नवीन कौशिक): रहमन डकैतचा सर्वात विश्वासू साथीदार आणि हमजाचा (रणवीर) जवळचा मित्र. क्लायमॅक्समध्ये पोलिसांशी दोन हात करताना डोंगा मृत्यूमुखी पडला होता.
advertisement
5/13
२. स्याही (रहुल्लाह गाझी): टोळीचा एक आक्रमक सदस्य. हमजासोबत झालेल्या हाणामारीत स्याहीचा खात्मा झाला होता.
advertisement
6/13
३. नईम बलोच (हितुल पुजारा): रहमन डकैतचा मोठा मुलगा. ज्याच्या हत्येचा बदला घेण्याच्या नादात रहमनने स्वतःच्या वडिलांनाही सोडलं नाही.
advertisement
7/13
४. बाबू डकैत (आसिफ अली हैदर खान): रहमन डकैतचे वडील. स्वतःच्याच मुलाने (रहमन) दगडाने ठेचून त्यांची हत्या केल्याचा थरार पहिल्या भागात दिसला होता.
advertisement
8/13
५. लुल्ली डकैत (नसीम मुगल): बाबू डकैतचा उजवा हात. हमजासोबतच्या संघर्षात या पात्राचाही खेळ संपला होता.
advertisement
9/13
पहिल्या भागात रहमन डकैतची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाने आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांवर गारुड घातलं होतं. जरी क्लायमॅक्समध्ये त्याचा मृत्यू झाला असला, तरी चाहत्यांच्या प्रचंड मागणीखातर आदित्य धरने त्याला सिक्वेलमध्ये स्थान दिलं आहे.
advertisement
10/13
मात्र, अक्षय खन्ना पूर्ण चित्रपटात नसून तो केवळ महत्त्वाच्या फ्लॅशबॅक सीनमध्ये दिसणार आहे. रहमन डकैतचा इतिहास आणि त्याचे पाकिस्तानमधील धागेदोरे उलगडण्यासाठी हे सीन्स अत्यंत महत्त्वाचे ठरतील.
advertisement
11/13
'धुरंधर २' मध्ये सर्वात मोठं आकर्षण असणार आहे ते म्हणजे 'बडे साहेब' हे पात्र. सोशल मीडियावर सध्या जोरात चर्चा आहे की, बॉलीवूडचा 'सिरीयल किसर' इम्रान हाश्मी या चित्रपटात मुख्य खलनायक म्हणजेच 'बडे साहेब'ची भूमिका साकारणार आहे. अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली, तरी या कथेतील सस्पेन्स वाढवण्यासाठी इम्रानची एन्ट्री गेम चेंजर ठरू शकते.
advertisement
12/13
या सिक्वेलमध्ये सारा अर्जुन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, आर माधवन, दानिश पांडोर आणि गौरव गेरा हे कलाकार त्यांच्या भूमिका पुन्हा साकारताना दिसतील.
advertisement
13/13
तसेच, दिग्दर्शक आदित्य धर यांची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतम देखील या चित्रपटात एक विशेष कॅमिओ करताना दिसणार आहे. तिने ५ दिवसांचे शूटिंग पूर्ण केल्याचे वृत्त असून ती या स्पाय युनिव्हर्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 मध्ये नवे चेहरे अन् स्पेशल कॅमिओ, कोण घेणार एन्ट्री आणि कोणाचा पत्ता कट? Full Cast लिस्ट आली समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल