TRENDING:

'आमचे धर्म वेगळे म्हणून माझे बाबा...', अरबाझ पटेलने प्रपोज करताच निक्की तांबोळी ढसाढसा रडली, शोमध्ये सगळंच सांगून टाकलं

Last Updated:
The 50 शोच्या एका टास्कमध्ये अरबाज पटेलने असा काही मास्टरस्ट्रोक मारला की संपूर्ण वातावरणच बदलून गेलं. नॅशनल टेलिव्हिजनवर गुडघ्यावर बसून अरबाजने निक्कीला प्रपोज केलं.
advertisement
1/11
'आमचे धर्म वेगळे म्हणून माझे बाबा...', अरबाझने प्रपोज करताच निक्की ढसाढसा रडली
मुंबई : व्हॅलेंटाईन डे जवळ असतानाच, 'The 50' च्या शोमध्येही प्रेमाचे रंग पाहायला मिळाले. एका बाजूला प्रिन्स नरुला, रजत दलाल आणि सिवेत तोमर यांच्यात वादाची ठिणगी पडल्यानंतर लायनने शोमधील महिलांसाठी खास टास्कचं आयोजन केलं होतं.
advertisement
2/11
यावेळी अरबाज पटेलने असा काही मास्टरस्ट्रोक मारला की संपूर्ण वातावरणच बदलून गेलं. नॅशनल टेलिव्हिजनवर गुडघ्यावर बसून अरबाजने जेव्हा निक्कीला प्रपोज केलं, तेव्हा घरातील प्रत्येक सदस्य प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाले.
advertisement
3/11
शोमध्ये पाहुण्या म्हणून आलेल्या उर्फी जावेद आणि निया शर्मा यांनी मुलांना मुलींचं मनोरंजन करण्याचं टास्क दिलं होतं. पण अरबाजने या संधीचं सोनं करत थेट निक्की तांबोळीसमोर आपलं हृदय मोकळं केलं.
advertisement
4/11
अरबाज म्हणाला, "माझं हृदय सध्या खूप जोरात धडधडतंय. निक्की मला नेहमी म्हणायची की आपण कधीच ऑफिशिअली एकमेकांना प्रपोज केलं नाही. ज्या कलर्स चॅनेलने आम्हाला एकत्र आणलं, तिथेच आज मी सर्वांसमोर तिला प्रपोज करतोय, निक्की, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो!"
advertisement
5/11
अरबाज पुढे म्हणाला की, तो आधी खूप तापट स्वभावाचा होता, कोणाचंच ऐकायचा नाही. पण निक्कीच्या सहवासात तो पूर्णपणे बदलला आहे. "तिला पाहिलं की माझा राग बर्फासारखा वितळतो," असं म्हणत त्याने निक्कीच्या हाताला किस केलं.
advertisement
6/11
हा क्षण जितका रोमँटिक होता, तितकाच तो भावुकही ठरला. निक्कीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते, पण तिच्या मनात एक भीतीही होती.
advertisement
7/11
निक्कीने खुलासा केला की, "आम्ही गेल्या दीड वर्षांपासून एकत्र आहोत, पण आमचे धर्म वेगळे असल्यामुळे माझे वडील या नात्याला स्वीकारत नाहीत. मी माझ्या वडिलांच्या विरोधात गेलेय, पण माझ्या आईने मला शिकवलंय की कोणासाठीही प्रेमाची कुर्बानी कधीच देऊ नये."
advertisement
8/11
निक्की पुढे म्हणाली, "वडिलांचं प्रेम वेगळं असतं आणि जोडीदाराचं वेगळं. मला आशा आहे की माझे बाबा आमचं प्रेम समजून घेतील, कारण मी अरबाजशिवाय कोणाचाही विचार करू शकत नाही."
advertisement
9/11
निक्कीचं हे बोलणं ऐकून घरातील नेहल चुडासमा आणि आरुषी चावला यांच्याही डोळ्यांत पाणी आलं.
advertisement
10/11
निक्की आणि अरबाजची पहिली भेट 'बिग बॉस मराठी ५' मध्ये झाली होती. तिथेच त्यांच्यात 'लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट' झालं. निक्की अरबाजपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे, पण त्यांच्या प्रेमात वयाचं अंतर कधीच आड आलं नाही.
advertisement
11/11
ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांनी आपलं नातं जगजाहीर केलं होतं आणि तेव्हापासून हा जोडीदार निक्कीच्या प्रत्येक संकटात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आमचे धर्म वेगळे म्हणून माझे बाबा...', अरबाझ पटेलने प्रपोज करताच निक्की तांबोळी ढसाढसा रडली, शोमध्ये सगळंच सांगून टाकलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल