TRENDING:

IIT करून घेतली बॉलिवूडमध्ये एंट्री; फ्लॉप होताच घेतला मोठा निर्णय; आता गुगल हेड झाली 'ही' अभिनेत्री

Last Updated:
बॉलीवूडमध्ये असे अनेक प्रतिभावान कलाकार आहेत जे लोकप्रिय झाले, पण आज ते अभिनयाच्या जगापासून दूर आहेत. तिने जुगल हंसराजसोबत करिअरची सुरुवात केली होती. पण महेश भट्टच्या ‘पापा कहते हैं’ या चित्रपटातूनच तिला खरी ओळख मिळाली होती. पण एक दोन चित्रपटात काम करून ही अभिनेत्री गायब झाली. पण आता ती मोठ्या पदावर काम करते.
advertisement
1/8
बॉलिवूडमध्ये फ्लॉप होताच अभिनेत्रीनं घेतला मोठा निर्णय; आता आहे गुगलची हेड
बॉलिवूडमध्ये नव्वदच्या दशकात एक अशी अभिनेत्री होती जी पहिल्या चित्रपटातून लोकप्रिय झाली. तिने जुगल हंसराजसोबत करिअरची सुरुवात केली होती.
advertisement
2/8
या अभिनेत्रीचं नाव म्हणजे मयुरी कांगो. मयुरीने 1995 मध्ये जुगल हंसराजसोबत करिअरची सुरुवात केली होती. पण महेश भट्टच्या ‘पापा कहते हैं’ या चित्रपटातूनच तिला खरी ओळख मिळाली होती.
advertisement
3/8
त्यानंतर मयुरी अजून काही चित्रपटात झळकली पण तिला फिल्मी दुनियेत ते स्थान मिळालं नाही आणि लवकरच ती अभिनय विश्वातून गायब झाली.
advertisement
4/8
मयुरी शेवटची 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘वामसी’मध्ये दिसली होती.
advertisement
5/8
मयुरीने चित्रपटानंतर मालिकांमध्ये नशीब अजमावलं. तिने ‘नरगिस’, ‘थोडा गम थोडी खुशी’, ‘डॉलर बाबू’ आणि ‘किट्टी पार्टी’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.
advertisement
6/8
डिसेंबर 2003 मध्ये तिने औरंगाबादमध्ये NRI आदित्य ढिल्लनसोबत लग्न केलं. मयुरी आणि आदित्य यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती.
advertisement
7/8
फिल्मी करिअर फ्लॉप झाल्यानंतर मयुरी लग्न करून अमेरिकेला शिफ्ट झाली. अभिनेत्रीनं तिकडे एमबीएचं शिक्षण घेतलं आणि तिथेच तिला पहिली नोकरीही मिळाली आहे.
advertisement
8/8
2019 मध्ये मयुरी गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड बनली. मयुरी आता भारतात शिफ्ट झाली असून तिला एक मुलगाही आहे. मयुरीने याशिवाय नेस्ले, उबर, एअरटेल यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांमध्येही काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
IIT करून घेतली बॉलिवूडमध्ये एंट्री; फ्लॉप होताच घेतला मोठा निर्णय; आता गुगल हेड झाली 'ही' अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल