TRENDING:

'दमायला होतं रे...', प्रशांत दामलेंचं एक वाक्य आणि आतून पूर्ण हलला मराठी अभिनेता

Last Updated:
Aastad Kale on Prashant Damle : आस्ताद काळेने मराठी रंजभूमी गाजवणाऱ्या प्रशांत दामले यांच्याबद्दल सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमुळे चाहते प्रशांत दामले यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
advertisement
1/7
'दमायला होतं रे...', प्रशांत दामलेंचं एक वाक्य आणि आतून  हलला मराठी अभिनेता
प्रशांत दामले हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. आपल्या विनोदी शैली आणि अभिनयासाठी ते ओळखले जातात. मराठी रंगभूमीवर सर्वाधिक प्रयोग करणारे अभिनेते म्हणून प्रशांत दामले ओळखले जातात. गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ ते रंगभूमीवर सक्रीय असून त्यांच्या अनेक नाटकांचे हजारो प्रयोग झाले आहेत.
advertisement
2/7
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळे याने प्रशांत दामले यांच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट लक्ष वेधून घेत असून चाहते आता प्रशांत दामले यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
advertisement
3/7
आस्ताद काळेने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,"काल माझ्या प्रयोगाआधी "एका लग्नाची पुढची गोष्ट"चा प्रयोग होता. नेहमीप्रमाणेच चांगली गर्दी होती. मी विंगेत प्रशांत दादांना भेटायला गेलो. त्यांच्या एन्ट्रीला थोडा वेळ होता. म्हटलं माझा प्रयोग आहे यानंतर, बसताय का? तर म्हणाले "उद्या सकाळी 9 वाजता परिषदेची GBM आहे रे." मग काही क्षण थांबले आणि म्हणाले,"दमायला होतं रे आस्त्या....या महिन्यात 28 प्रयोग आहेत...पुढच्या महिन्यात 31..." आणि झटक्यात पुन्हा पूर्ण एनर्जी लावून त्यांनी एन्ट्री घेतली".
advertisement
4/7
आस्तादने लिहिलं आहे,"एक लक्षात घ्या, या 28 पैकी फक्त 12 प्रयोग मुंबईत आहेत. बाकी सगळे दौरे. म्हणाले," मराठी नाटकाला फिरण्यावाचून पर्याय नाही रे...मुंबईत 6 थिएटर्समधे मिळून महिना 12 प्रयोग...बाकी भ्रमंतीच.." 1985-86 पासून सतत मराठी व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत असणारा हा कलाकार. 13333 प्रयोग सादर केलेला हा कलाकार. प्रेक्षकांची नस बरोबर समजलेला हा कलाकार. मी काही त्यांना फार ओळखतो असं नाही, पण 'जादू तेरी नजर'च्या निमित्ताने त्यांच्याबरोबर सुमारे 2.5 वर्षं घालवली. तेव्हा "जादू"चे आम्ही महिन्याला सरासरी 25 प्रयोग तरी करत असू. (प्रशांत दादा साधारण एकूण 45-55च्या आसपास करायचे.). त्या 2.5 वर्षांत त्यांचं SUPERSTARDOM तर पाहीलंच, पण आतला एक तुमच्या आमच्यासारखाच मध्यमवर्गीय माणूसही पाहिला. त्याच, तशाच प्रश्नांनी चिंताग्रस्त झालेला. 2 मुली आहेत, त्यांचं शिक्षण-भविष्य या गोष्टींचं रीतसर प्लॅनिंग करणारा. कौटुंबिक जिव्हाळ्यात रमणारा.
advertisement
5/7
आस्तादने पुढे लिहिलं आहे,"अगदी आमच्यातले होऊन वागायचे, बोलायचे. Stardom कधीही खांद्यावर घेऊन वावरताना मी तरी त्यांना पाहिलं नाही. त्यांनी एक नाटक केलं होतं सुप्रिया पिळगांवकरांबरोबर. जरा गंभीर आशयाचं होतं. "आम्ही दोघं राजा राणी". फार सुंदर कामं करायचे दोघंही. पण जास्त चाललं नाही ते. "बहुरूपी"मधेही खूप जीव ओतून काम करायचे, पण त्याही नाटकाची तीच गत झाली. प्रेक्षकांनी कदाचित स्वीकारलं नाही. एकदा म्हणाले होते," केला रे वेगळा प्रयत्न. नाही यशस्वी झाला. आणि आता या स्टेजला रिस्ट घेणं जरा धोकादायक वाटतं." ते तेव्हाही टॉपलाच होते आणि तिथे असताना ही भीती रास्तच होती".
advertisement
6/7
प्रशांत दामले हे नट म्हणून कोणाला कसे वाटतात, हा ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे. पण दोन गोष्टी कोणीही नाकारू शकत नाही. 1) ते स्टेजवर असताना आपलं दुसरीकडे लक्ष जात नाही. 2) कोविडच्या काळानंतर जवळजवळ 7-8 महिन्यांनी रंगमंदिरं खुली झाली. एकूण क्षमतेच्या 50% प्रेक्षकसंख्येनी प्रयोग करायला परवानगी मिळाली. पण प्रेक्षकांच्या मनातील भीती तशीच होती. त्या वेळी लोकांना नाट्यगृहात आणण्याची किमया जमणं, हे फक्त प्रशांत दामले यांनाच शक्य होतं. त्यांनी ते केलंही. काल त्यांच्या "दमायला होतं रे आस्त्या.."नी आत काहीतरी हलल्यासारखं झालं. भरून आल्यासारखं.
advertisement
7/7
आस्ताद काळेच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी प्रशांत दामलेंबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांना काही काळ विश्रांती घेण्याचा सल्लाही चाहते देत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'दमायला होतं रे...', प्रशांत दामलेंचं एक वाक्य आणि आतून पूर्ण हलला मराठी अभिनेता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल