'10 मिनिटं ते लोक', उर्फी जावेदच्या घरी मध्यरात्री 2 तरुणांचा भयंकर प्रकार, पोलीस आले तरी...
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Urfi Javed : आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या घरी मध्यरात्री साडे तीन वाजता 2 अनोळखी व्यक्तींनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे.
advertisement
1/7

'फॅशन क्वीन' उर्फी जावेद कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. बहुतेक वेळा ती तिच्या फॅशन सेन्स आणि बोल्डपणामुळे प्रसिद्धीझोतात असते. पण यावेळी तिने स्वतःचा एक भीतीदायक अनुभव सांगितला आहे. उर्फी सध्या खूप घाबरलेली आहे. अर्ध्या रात्री दोन अनोळखी व्यक्तींनी तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
2/7
दोन अनोळखी व्यक्ती सतत उर्फी जावेदच्या घराची डोअरबेल वाजवत होते. ज्यामुळे ती खूप घाबरली आणि अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नाही. तिने हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला असून, हे ऐकून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
advertisement
3/7
उर्फी जावेदने हा भयानक अनुभव सोशल मीडियानंतर ई-टाइम्ससोबत शेअर केला आहे. या मुलाखतीत तिने सांगितले की 22 डिसेंबरच्या मध्यरात्री सुमारे 3.30 वाजता एत अनोळखी व्यक्ती सलग जवळपास 10 मिनिटे तिच्या घराची डोअरबेल वाजवत होती.
advertisement
4/7
उर्फीला नंतर कळले की तो एकटा नसून दोन जण होते. उर्फीने सांगितले की ते दोघे तिच्या घराबाहेरून जातच नव्हते. त्यामुळे तिला पोलिसांची मदत घ्यावी लागली. पोलिस आल्यावरच ते दोघे तिथून पळून गेले.
advertisement
5/7
उर्फी जावेदने सांगितले की जेव्हा दोन लोक सतत 10 मिनिटे डोअरबेल वाजवत होते. तेव्हा ती बाहेर जाऊन पाहायला गेली. तिने सांगितले की बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीने तिला दरवाजा उघडायला सांगितले आणि घरात येण्याचा आग्रह धरला. दुसरी व्यक्ती घराच्या एका कोपऱ्यात उभी होती. उर्फीने त्यांना तिथून निघून जायला सांगितले, पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर तिने पोलिसांना फोन करेन असा इशारा दिला.
advertisement
6/7
उर्फीने पुढे सांगितले की तिने पोलिसांना फोन केला आणि पोलिस आल्यावरही ते दोघे उद्धटपणे वागत होते. ते वारंवार “निघ, निघ” असे बोलत होते आणि तिथून जाण्यास नकार देत होते. उर्फीने सांगितले की हा अनुभव तिच्यासाठी अत्यंत भयानक होता.
advertisement
7/7
उर्फी म्हणाली की, रात्री 3 वाजता एखादी व्यक्ती एखाद्या मुलीच्या घराबाहेर उभी राहून दरवाजा उघडायला सांगते आणि निघून जायलाही नकार देते तर ते कुणासाठीही भीतीदायक असते. विशेषतः एकटी राहणाऱ्या मुलीसाठी ही परिस्थिती खूपच धोकादायक आणि भयानक असते. उर्फी जावेदने या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिला स्वतःबद्दल असुरक्षित वाटत आहे. तिच्या विरोधात काय कारवाई होणार, हे तिला जाणून घ्यायचे आहे, असे तिने सांगितले. उर्फीच्या सुरक्षेबाबत तिचे चाहतेही चिंतेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'10 मिनिटं ते लोक', उर्फी जावेदच्या घरी मध्यरात्री 2 तरुणांचा भयंकर प्रकार, पोलीस आले तरी...