
सांगली: वीरगळ म्हणजेच इतिहासाच्या अभ्यासाचे एक वस्तुरूपी साधन होय. गावोगावी कधी पाराजवळ तर कधी शेतावर, इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले वीरगळ पाहायला मिळतात. यापैकी सांगलीच्या देवराष्ट्रे गावात पिढ्यानपिढ्या शेंदूर फासून, नारळ वाहून श्रद्धेने पूजले जाणारे चार वीरगळ इतिहास संशोधकांच्या निदर्शनास आलेत. आजवर धार्मिक कारणांनी पुजल्या गेलेल्या या वीरगळांचे ऐतिहासिक महत्त्व काय? पाहुयात.
Last Updated: Dec 23, 2025, 14:06 ISTमहानगरपालिका निवडणूका जशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे सर्वांचं लक्ष हे शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्या युतीकडे आहे.त्यातच शिवसेना (उबाठा) चे खासदार संजय राऊत म्हणाले की, "उबाठा आणि मनसे यांच्यामध्ये युती झालेली आहेच.फक्त जागावाटपावर राजसाहेब आणि उद्धवजी यांनी एकत्र येवून या संदर्भात शेवटच्या फॉर्मुल्याची घोषणा करणं बाकी आहे."
Last Updated: Dec 23, 2025, 15:52 ISTडोंबिवलीच्या जिमखाना मैदानात वेगवेगळ्या रंगांच्या पडद्यांनी भारतमातेची मोझॅक कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीसाठी कलाकारांना नऊ दिवस लागले आहेत. 95 फुट उंची आणि 75 फुट रुंदी या कलाकृतीची आहे. तर या कलाकृतीसाठी अडीच लाखाहून अधिक रंगीबेरंगी पडद्यांचा या अद्भूत कलाकृतीसाठी वापर केला गेला. या कलाकृतीचे आणि कलाकरांचे 'वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया' अंतर्गत एक जागतिक विक्रम नोंदवला आहे. या कलाकृतीच्या कलाकारांची चेतन राऊत,वैभव प्रभू कापसे अशी नावे आहेत.
Last Updated: Dec 23, 2025, 15:28 ISTछत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील गाढे जळगाव येथे शिवाजी कोरडे हे गेल्या सहा वर्षांपासून हॉटेल व्यवसायात रुजू आहेत. सुरुवातीच्या काळात या तरुणाने नाश्ता सेंटर चालवले त्यानंतर त्या नाश्ता सेंटरला हॉटेलचे स्वरूप दिले. आता कोरडे यांच्या तिरंगा हॉटेलमध्ये अनलिमिटेड मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी 250 ते 300 रुपयांना मिळते.
Last Updated: Dec 23, 2025, 15:06 ISTसंशोधन क्षेत्रात अनेक गोष्टींचे संशोधन कायमच चालू असते.भारतावर मोगल असतील किंवा निजाम सत्ता असेल अशा अनेकांनी आपले वर्चस्व ठेवले होते.पण त्यांच्या सत्तेचे प्राचीन अवशेष ईथेच कायम अबाधित राहिले आहेत. हजारो वर्षांनी संशोधनातून पुरातत्व शास्त्रांच्या हाती भारतातील काही ठीकाणचे अवशेष सापडत आहेत. सोलापूरमधील बोरामनी गवताळ प्रदेशात भातातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह सापडला आहे. दोन हजार वर्षांच्या प्राचीन रोमन संस्कृतीच्या खूणा यात दिसून आल्या आहेत. या भागात रोम सत्ता साम्राज्य होते.त्यांचे व्यापारी धोरण होते.लहान दगडापासून बनवलेल्या या चक्कव्यूहात अनेक काड्यांच्या मातीचा एक वेगळा थर आहे.जो अनेक वर्ष अबाधित राहू शकतो. हे सगळं इतिहास संशोधकांच्या अभ्यासातून दिसत आहे.यासाठी पुण्याचे कातळशिल्प अभ्यासक सचिन पाटील यांना या भारतातील सगळ्यात मोठ्या पंधरा रिंग असलेल्या चक्रव्यूहाच्या संशोधनासाठी पाचारण करण्यात आले होते.
Last Updated: Dec 23, 2025, 15:04 ISTठाणे : लहान मुलांना किंवा घरातील इतर सदस्यांना मेथीची भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल. त्यातच हिवाळा म्हटले की मार्केटमध्ये सहज मिळणारी पालेभाजी म्हणजे मेथी. मेथीची भाजी, पराठे, मेथी सूप खाऊन कंटाळा आला असेल तर खमंग आणि कुरकुरीत मेथी पुरी तुम्ही बनवू शकतात. ही मेथी पुरी सर्वच जण आवडीने खातील.
Last Updated: Dec 23, 2025, 14:40 IST