Apurva Nemlekar : 'तू इथं नाहीयेस हे...' एक वर्षापूर्वी झालं लाडक्या भावाचं निधन; अजूनही सावरली नाहीये अपूर्वा नेमळेकर
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमधून शेवंताच्या भूमिकेत घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. सध्या ती 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अपूर्वाने तिच्या खाजगी आयुष्यात तिने खूप धक्के सोसले आहेत.एका वर्षापूर्वी अपूर्वाच्या भावाचं निधन झालं. आता अभिनेत्रीनं तिच्या भावासाठी एक इमोशनल पोस्ट केली आहे.
advertisement
1/8

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमधून तिला विशेष लोकप्रियता मिळाली.
advertisement
2/8
बिग बॉस मधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. तिच्या खाजगी आयुष्यात तिने खूप धक्के सोसले आहेत.
advertisement
3/8
एका वर्षापूर्वी अपूर्वाच्या सक्ख्या भावाचं अकाली निधन झालं. त्यामुळे तिच्या खाजगी आयुष्यात मोठं वादळ आलं. आता अभिनेत्रीनं तिच्या भावासाठी एक इमोशनल पोस्ट केली आहे.
advertisement
4/8
अपूर्वाचा भाऊ फक्त 28 वर्षांचा होता. अपूर्वाच्या भावाचं ओंकार नेमळेकरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती आहे.
advertisement
5/8
अपूर्वाने आता भावासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलंय की, 'मी तुला निराश करतेय याचं मला दुःख आहे. तू इथं नाहीयेस हे लक्षात ठेऊन स्ट्रॉंग होऊन जगणं माझ्यासाठी कठीण आहे.'
advertisement
6/8
'तुला जाऊन आज एक वर्ष झालं. पण माझा एक दिवसही जात नाही, ज्या दिवशी मला तुझी आठवण येत नाही. आय मिस यु' अशी भावुक पोस्ट तिने केली आहे.
advertisement
7/8
अपूर्वाच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत तिला धीर दिला आहे.
advertisement
8/8
अपूर्वाच्या वडिलांचं आधीच निधन झालं असून ती आई आणि भावासोबत राहत होती. आता तिच्या भावाचही निधन झाल्यानं ती एकटी पडली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Apurva Nemlekar : 'तू इथं नाहीयेस हे...' एक वर्षापूर्वी झालं लाडक्या भावाचं निधन; अजूनही सावरली नाहीये अपूर्वा नेमळेकर