Psychological Thriller Series: 8 एपिसोडची सायकॉलॉजिकल थ्रिलर सिरीज, ओटीटीवर घातला धुमाकूळ, बघायला बसल्यावर शेवटपर्यंत उठणार नाही
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Psychological Thriller Series: ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट बघायला मिळतं. प्रेमकथा, कौटुंबिक मालिका, अॅक्शन आणि सस्पेन्स थ्रिलर.
advertisement
1/7

ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट बघायला मिळतं. प्रेमकथा, कौटुंबिक मालिका, अ‍ॅक्शन आणि सस्पेन्स थ्रिलर. एका सायकोलॉजिकल थ्रिलर सिरीजविषयी जाणून घेऊया जी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.
advertisement
2/7
या सायकॉलॉजिकल थ्रिलर सिरीजचं नाव आहे, "असुर". ही वेब सिरीज पहिल्यांदा 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यावेळी लॉकडाऊनमुळे सगळं बंद होतं, पण घरात बसून लोकांनी या मालिकेला जबरदस्त प्रतिसाद दिला.
advertisement
3/7
ओटीटीवर सिरीजने धुमाकूळ उडवला. ही सिरीज तुम्ही जिओ सिनेमावर पाहायला मिळेल. "असुर सीझन 1" ही सिरीज एका अशा तरुणाची कहाणी सांगते जो दिसायला सामान्य वाटतो, पण त्याच्या डोक्यात चाललेलं गणित सगळ्यांपेक्षा वेगळं असतं.
advertisement
4/7
तरुण धर्म, अध्यात्म आणि विज्ञान यांचं एक विचित्र मिश्रण वापरतो आणि ते वापरून तो लोकांचं ब्रेनवॉश करतो. मग सुरू होतो एका पाठोपाठ एक खुनांचा सिलसिला.
advertisement
5/7
सीबीआयच्या अधिकाऱ्यांना जेव्हा हे सगळं कळतं, तेव्हा त्याचा माग काढायला सुरुवात होते. पण तो तर एक सिरीयल किलर निघतो, जो प्रत्येक गोष्ट अगदी योजनाबद्ध पद्धतीने करतो. त्यामुळे त्याला पकडणं म्हणजे अंधारात दिवा शोधण्यासारखं आहे.
advertisement
6/7
या मालिकेत अर्शद वारसी यांनी सीबीआय अधिकारी धनंजय राजपूतची भूमिका केली आहे, तर वरुण सोबती यांनी निखिल नायर या पात्राला जीवंत केलं आहे. रिद्धी डोगरा, अनुप्रिया गोयंका आणि लोलार्क दुबे यांच्यासारख्या कलाकारांनीही जबरदस्त कामगिरी केली आहे.
advertisement
7/7
प्रत्येक एपिसोडमध्ये असं काही घडतं की, तुम्ही "अगदी शेवटी काय होणार?" या विचारात गुंतून जाता. त्यामुळे हे 8 भाग एकाच दमात पाहून संपवावेसे वाटतात. दोन सीझननंतर आता चाहत्यांना उत्सुकता आहे की "असुर सीझन 3" कधी येणार? अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Psychological Thriller Series: 8 एपिसोडची सायकॉलॉजिकल थ्रिलर सिरीज, ओटीटीवर घातला धुमाकूळ, बघायला बसल्यावर शेवटपर्यंत उठणार नाही