Dhurandhar 2 हिट, पण रणवीर सिंगच्या आयुष्यात वादळ; दीपिका पादुकोणसोबत बिनसलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dhurandhar 2 : रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे बेस्ट सेलिब्रिटी कपल्सपैकी एक. पण आता धुरंधर 2 च्या यशानंतर मात्र त्यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.
advertisement
1/7

रणवीर सिंगची धुरंधर 2 फिल्म चांगलीच हिट ठरली आहे. या फिल्मने कित्येक रेकॉर्ड मोडत इतिहास रचला आहे. जिथं तिथं सगळीकडे धुरंधर द रिव्हेंजची चर्चा आहे. पण रणवीर सिंगची पत्नी अभिनेत्री दिपिका पादुकोणकडून मात्र यावर एकही प्रतिक्रिया आली नाही आहे.
advertisement
2/7
रणवीर सिंगच्या धुरंधर 2 चा बोलबोला असताना दिपिका पादुकोण याबाबत कुठेच व्यक्त होताना दिसली नाही आहे. ना तिने सोशल मीडिया पोस्ट केली, ना कोणत्या पोस्टवर कमेंट केली, ना ती सक्सेस पार्टीला होती.
advertisement
3/7
नवरा रणवीरची फिल्म इतकी हिट होऊनही बायको दिपिकाने मौन का बाळगलं, ती शांत का बसली आहे? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
advertisement
4/7
धुरंधर 2 किंवा रणवीरबाबत काहीच प्रतिक्रिया न दिल्याने, कुठेच काहीच भावना व्यक्त न केल्याने दीपिका ट्रोल झाली आहे. अशी पार्टनर कशाला हवी अशा कमेंट कित्येकांनी केल्या आहेत.
advertisement
5/7
दरम्यान काही जण दिपिकाच्या पाठिशी उभे राहिले आहेत. पोस्ट नाही किंवा प्रतिक्रिया नाही म्हणजे सपोर्ट नाही असं नसतं. प्रत्येक वेळी रिएक्ट होणं गरजेचं नसतं, अशा कमेंटही काही जणांच्या आहेत.
advertisement
6/7
दरम्यान रणवीरच्या धुरंधर 2 वर दिपिकाचं मौन म्हणजे या कपलमध्ये काहीतरी बिनसल्याचीही चर्चा होते आहे. अगदी त्यांच्या घटस्फोटापर्यंत लोक पोहोचले आहेत.
advertisement
7/7
एका युझरने पोस्टवर कमेंट करताना धुरंधर 2 च्या यशामुळे त्यांचा घटस्फोटाला उशीर झाला आहे नाहीतर ते वेगळे झाले असतं, असं थेट म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 हिट, पण रणवीर सिंगच्या आयुष्यात वादळ; दीपिका पादुकोणसोबत बिनसलं?