TRENDING:

'सैराट'ची आर्ची खऱ्या आयुष्यात कशी? रिंकू राजगुरू म्हणाली,"लोकांना माझं फिल्मी आयुष्य दिसतं पण..."

Last Updated:
Rinku Rajguru : 'सैराट' फेम रिंकू राजगुरू आता 'आशा' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दरम्यान एका मुलाखतीत रिंकूने वैयक्तिक आयुष्यात ती कशी आहे यावर भाष्य केलं आहे.
advertisement
1/7
'सैराट'ची आर्ची खऱ्या आयुष्यात कशी? रिंकू राजगुरू म्हणाली,"लोकांना माझं..."
'सैराट' या जवळपास 10 वर्षांपूर्वी थिएटरमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून रिंकू राजगुरू महाराष्ट्रभर पोहोचली. तिने साकारलेली आर्ची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. 'सैराट'नंतर तिने अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पण आजही महाराष्ट्र तिला 'आर्ची' याच नावाने ओळखतो.
advertisement
2/7
रिंकूचा आता 'आशा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान मटाला दिलेल्या मुलाखतीत रिंकूने वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं आहे. रिंकू म्हणाली,"लोकांना माझं फिल्मी आयुष्य दिसतं. मात्र त्यामागचं खरं आयुष्य अत्यंत साधं आहे. चित्रीकरण संपलं की मी थेट अकलूजमधूल माझ्या घरी जाते".
advertisement
3/7
रिंकू म्हणाली,"अकलूजमध्ये आई-वडिलांसोबत वेळ घालवते. प्राण्यांजवळ राहते, वाचन करते आणि सिनेमे पाहते. सकाळचा-संध्याकाळचा चहा, जेवण हे सगळं कुटुंबासोबत होतं आणि त्यातूनच मला खरा आनंद मिळतो. माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर कधीही कोणतीही बंधनं घातली नाहीत".
advertisement
4/7
रिंकू पुढे म्हणाली,"माझ्या आई-बाबांनी मला नेहमी एकच गोष्ट सांगितली की, जे मनापासून आवडेल तेच काम कर. त्यात आनंद नसेल तर त्या कामाला काही अर्थ नाही. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे".
advertisement
5/7
दिवसभरात जे काही घडतं ते सगळं मी आईला फोनवर सांगते. शेवटी मला एवढंच वाटतं की, काम नेहमी तिथेच करावं जिथे समाधान आणि आनंद मिळतो. केवळ नाव किंवा प्रसिद्धीसाठी काही करण्यापेक्षा मन:शांति अधिक महत्त्वाची आहे".
advertisement
6/7
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'आशा' या फिल्मबद्दल बोलताना रिंकू म्हणाली,"सैराट सिनेमातील आर्ची या भूमिकेमुळे मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. त्यामुळे एक वेगळी ओळख मिळाली. मला कोणतीही व्यक्तिरेखा पुसायला आवडत नाही. आपल्या कामातून आपली भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहते. आशा ही भूमिकासुद्धा तितकीच धाडसी आहे. आर्चीची लोकप्रियता मला सुखावतेच पण आता विविधांगी भूमिकाही मला साकारायच्या आहेत".
advertisement
7/7
'आशा' सिनेमा निवडण्याबद्दल रिंकू म्हणाली,"या सिनेमाच्या माध्यमातून आशा सेविकांचं गावपातळीवरचं कामकाज कसं चालतं त्यांचा संघर्ष काय? अशा अनेक कारणांमुळे आशा सेविकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा सिनेमा मला करावासा वाटला".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'सैराट'ची आर्ची खऱ्या आयुष्यात कशी? रिंकू राजगुरू म्हणाली,"लोकांना माझं फिल्मी आयुष्य दिसतं पण..."
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल