दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी गावात राहणाऱ्या दिनेश वाघमारे (वय 16) याने शेतकऱ्यांसाठी मल्टीपर्पज ॲग्रीकल्चर मशीन बनवले आहे. शेतकऱ्यांना परवडेल असा हा यंत्र 16 वर्षीय दिनेशने बनवला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा डिझेल किंवा पेट्रोलवर चालत नसून सौर ऊर्जेवर चालणारे यंत्र आहे. या एका मशीनद्वारे शेतकऱ्यांना नांगरणी, कोळपणी, पेरणी, फवारणी, ड्रिंचिंग, मल्चिंग आणि गवत कापता येणार आहे. ट्रॅक्टरद्वारे किंवा इतर यंत्राद्वारे शेतीची कामे करत असताना वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करावा लागतो. याचाच विचार लक्षात ठेवून दिनेश वाघमारे या तरुणाने हा एकच यंत्र बनवला आहे.
advertisement
2 तास मोबाईल आणि टीव्ही राहणार बंद, महाराष्ट्रातील या गावाने घेतला निर्णय, Video पाहून कराल कौतुक
दिनेशने बनवलेल्या मल्टीपर्पज ॲग्रीकल्चर मशीनवरती सोलर पॅनल बसवण्यात आले आहे. उन्हामध्ये जरी हा यंत्र ठेवला तर सौर ऊर्जेवर चार्ज होतो. हा यंत्र बनवण्यासाठी जवळपास 15 ते 16 दिवसांचा कालावधी लागला आहे. तर हा मल्टीपर्पज ॲग्रीकल्चर मशीन बनवण्यासाठी 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी दिनेश वाघमारे या तरुणाने मशीनचा पेटंट देखील मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. शेतकऱ्याच्या मुलाने बनवलेल्या या अनोख्या मशीनमुळे आता शेतकऱ्यांची कामे सोपी होणार आहेत.





