पैसे नसल्याने लिव्ह इनमध्ये राहायचा 'लिटिल चॅम्प्स'च्या TOP 5 मधील हा स्पर्धक, कोण आहे हा?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sa Re Ga Ma Pa Little Champs च्या TOP 5 मधील एक स्पर्धक पैसे नसल्याने गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहायचा.
advertisement
1/7

'लिटिल चॅम्प्स' फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर 23 जानेवारी 2023 रोजी पुण्यात विवाहबंधनात अडकले आहेत. पण लग्नाआधी काही काळ ते लिव्ह-इनमध्ये राहायचे.
advertisement
2/7
रोहित राऊतने आरपारला दिलेल्या मुलाखतीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं सांगितलं आहे. रोहित राऊत म्हणाला,"लिव्ह इनमध्ये राहणं ही आमची चॉईस नव्हती. तर आमची गरज होती. कारण लॉक डाऊन सुरू होतं आणि दोघांपैकी कोणाकडेच पैसे नव्हते".
advertisement
3/7
रोहित राऊत म्हणाला,"प्रत्यक्षात लॉक डाऊन लागलं त्याच्या फक्त 8 महिने आधी मी 'इंडियन आयडल'मध्ये होतो. त्यामुळे मी तेव्हा बाहेरचं रेकॉर्डिंग केलं नव्हतं. शो केले नव्हते. त्यामुळे माझ्याकडे पैसेच नव्हते. एखाद्या स्पर्धेत पैसे जिंकल्यानंतर ते 90 दिवसांनंतर मिळतात आणि तेही 30% कट होऊन. त्यामुळे ठरलेली बक्षीसाची रक्कम कधीच मिळत नाही".
advertisement
4/7
रोहित पुढे म्हणाला,"त्यावेळी लॉक डाऊनमध्ये पैसे नव्हते. याच एका कारणाने घरच्यांना सांगितलं की आम्ही एकत्र राहतोय. जुईच्या बाबांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना मी त्यावेळी हेच म्हणालो होतो की, जर पुढचा संसार सुरळीत चालवायचा असेल तर आता पैसे साठवणं गरजेचं आहे. आता या क्षणाला तिच्याकडेही नाहीत आणि माझ्याकडेही नाहीत. त्यामुळे तुम्ही सांगा काय करायला पाहिजे?".
advertisement
5/7
रोहितने जुईली जोगळेकरच्या वडिलांना विनंती, अनेक विनवण्या केल्यानंतर ते तयार झाले. प्रॅक्टिकल कारणाने जुईलीच्या वडिलांनी होकार दिला असल्याचं रोहित यावेळी म्हणाला.
advertisement
6/7
रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची पहिली भेट 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'च्या सेटवर झाली होती. यादरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला.
advertisement
7/7
जुईली जोगळेकर काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत लिव्ह-इनमध्ये राहण्याबाबत म्हणाली होती,"आई-बाबांनी समजून घेतलं, त्यांनी पाठिंबा दिल्याने आम्हाला लिव्ह-इनमध्ये राहता येत आहे. लग्न ठरवताना पालक आपल्या मुलांना फक्त 2-3 तासांसाठी भेटायला बाहेर सोडतात. पण त्या काळात आपल्याला संबंधित व्यक्ती पूर्णपणे ओळखता येत नाही. 24 तास एकत्र राहिल्यावरच या गोष्टी कळतात".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पैसे नसल्याने लिव्ह इनमध्ये राहायचा 'लिटिल चॅम्प्स'च्या TOP 5 मधील हा स्पर्धक, कोण आहे हा?