TRENDING:

Romantic Movie : कडाक्याची थंडी, गोधड्या-चादरी काढा, बायकोसोबत रात्री बघा हे पिक्चर

Last Updated:
Most Romantic Movie and Web Series : या कडाक्याच्या थंडीत कपाटातल्या गोधड्या चादरी काढा आणि आपल्या पार्टनरबरोबर हे पिक्चर आणि वेब सीरिज नक्कीच पाहा. 
advertisement
1/8
कडाक्याची थंडी, गोधड्या-चादरी काढा, बायकोसोबत रात्री बघा हे पिक्चर
हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. अनेक ठिकाणी एक अंकी तापमान असल्याचं पाहायला मिळतंय. अशा या गुलाबी थंडीत नुसता चहा आणि भजी नाही तर रात्री आपल्या पार्टनरबरोबर रोमँटीक मुव्ही पाहण्याची मजाही काही औरच आहे. या कडाक्याच्या थंडीत कपाटातल्या गोधड्या चादरी काढा आणि आपल्या पार्टनरबरोबर हे पिक्चर आणि वेब सीरिज नक्कीच पाहा. 
advertisement
2/8
जिस्म - प्रेम, प्रलोभन, अविश्वास आणि नात्यातील गुंतागुंत यावर आधारित रोमँटिक थ्रीलर असलेला हा सिनेमा आहे. जॉन अब्राहम, बिपाशा बसू यात प्रमुख भूमिकेत आहेत. एक वकील आणि एका विवाहित स्त्रीचं नातं आकर्षणाने सुरू होतं. पण हे नातं पुढे गुन्हा, फसवणूक आणि मानसिक खेळांमध्ये बदलतं. दोघांचे निर्णय त्यांना धोकादायक दिशेला कसे नेतात हे यात दाखवण्यात आलं आहे. 
advertisement
3/8
मर्डर ( 2004 ) - एका विवाहित स्त्रीचा जुना बॉयफ्रेंड परत येतो. त्यांची पुन्हा भेट होते आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत आणि गुन्ह्याची दिशा घेणारी कथा. नात्यातील असुरक्षितता आणि मानसिक ताण हा या सिनेमात केंद्रस्थानी आहेत.
advertisement
4/8
नशा - हा रोमँटिक ड्रामा आहे. एक किशोरवयीन विद्यार्थी आणि त्याच्या शिक्षिकेमधील आकर्षण त्याचे मानसिक आणि सामाजिक परिणाम तसंच त्याच्या नात्यातील नाजूक भावना या दाखवण्यात आल्या आहेत. forbidden relationship या प्रकारातील अडल्ट भावनिक विषय सिनेमात दाखवण्यात आला आहे.  
advertisement
5/8
कबीर सिंह - शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत असलेला इंटेन्स रोमँटिक ड्रामा असलेला हा सिनेमा आहे. एक डॉक्टर महिला एका मुलाच्या प्रेमात पडते. प्रेमामुळे निर्माण झालेले प्रेम, राग आणि तीव्र भावना त्याच्या आयुष्यावर कसा परिणाम करतात हे दाखवलं आहे.
advertisement
6/8
मसान - बनारसच्या पार्श्वभूमीवर विविध पात्रांची जीवनकथा, सामाजिक बंधनं, संघर्ष आणि एक लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. हा एक रिअलिस्टिक ड्रामा आहे.  
advertisement
7/8
मेड इम हेवन - दोन वेडिंग प्लॅनर्सच्या आयुष्यातील गुंतागुंत, त्यांची वैयक्तिक नाती, सामाजिक दडपण आणि आधुनिक प्रेमकथा सिनेमात दाखवण्यात आली आहे. शोभिता धुलिपाला , अर्जुन माथुर , जिम सर्भ , शशांक अरोड़ा , कल्कि कोचलिन , शिवानी रघुवंशी और मोना सिंह हे कलाकार यात प्रमुख भूमिकेत आहेत.  
advertisement
8/8
मिसमॅच - प्राजक्ता कोळी, रोहित सराफ प्रमुख भुमिकेत असलेल्या या सिनेमात मॉर्डन लव्ह स्टोरी आहे. कॉलेज लाइफ, मैत्री आणि मॉर्डन प्रेम सोप्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. यात अनेक कोझी रोमँटीक मुमेन्ट आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Romantic Movie : कडाक्याची थंडी, गोधड्या-चादरी काढा, बायकोसोबत रात्री बघा हे पिक्चर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल