Sachin Pilgaonkar : 'रात्री 3 वाजता उठवलं तरी मी उर्दूच बोलतो' असं काय बोलून गेले सचिन पिळगांवकर? 'महागुरु' चं नवं वक्तव्य चर्चेत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sachin Pilgaonkar : अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात उर्दू भाषेविषयी भाष्य केलं. 'मला झोपेतून उठवलं तरी मी उर्दू बोलतो' असं ते काम म्हणाले? पाहूयात.
advertisement
1/7

ज्येष्ठ मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही काम केलं. बालकलाकार म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली.
advertisement
2/7
सचिन पिळगांवकर यांना अभिनेत्री मीना कुमारी यांनी उर्दूचे धडे दिले होते हे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
advertisement
3/7
त्यांची मातृभाषा मराठी असली तरी त्यांचं उर्दूवर प्रचंड प्रेम आहे. हे सर्वांनाच माहिती आहे.
advertisement
4/7
सचिन पिळगांवकर यांनी त्यांचं उर्दूवरचं प्रेम जगजाहीर केलं आहे. 'बहार-ए-उर्दू' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपलं उर्दूवरचं प्रेम जगाला दाखवून दिलं.
advertisement
5/7
सचिन पिळगांवकर म्हणाले, "माझी मातृभाषा ही मराठी आहे पण मी विचार उर्दूमध्ये करतो."
advertisement
6/7
"रात्री 3 वाजता माझी बायको किंवा कोणी उठवतं तरी मी उर्दू बोलत उठतो. एवढंच नाही मी उर्दू बोलत झोपतोही."
advertisement
7/7
पिळगांवकर यांचं उर्दूवरचं प्रेम त्यांच्या बायकोलाही आवडतं. ते म्हणाले, "उर्दू एक अशी सवत आहे जी माझ्या बायकोला आवडते."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sachin Pilgaonkar : 'रात्री 3 वाजता उठवलं तरी मी उर्दूच बोलतो' असं काय बोलून गेले सचिन पिळगांवकर? 'महागुरु' चं नवं वक्तव्य चर्चेत