अग्नीचं फूल! गुलाबी साडीमध्ये सई ताम्हणकरचा कातिलाना अंदाज, खांद्यावरील टॅटू केला फ्लाँट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
सई तिचा नवा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. ''अग्नी''चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ६ डिसेंबरला हा चित्रपट ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.
advertisement
1/7

अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. मात्र, तिने केवळ मराठीच नाही, तर हिंदी सिनेसृष्टीतही तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
advertisement
2/7
सईने आजवर अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये तिच्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे. नुकतंच तिची ''मानवत मर्डर्स'' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यातील सईच्या कामाचे सर्वांनीच खूप कौतुक केले आहे.
advertisement
3/7
आता सई तिचा नवा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. ''अग्नी''चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ६ डिसेंबरला हा चित्रपट ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.
advertisement
4/7
सईच्या 'अग्नी' या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता प्रतिक गांधी, दिव्येंदू शर्मा, जितेंद्र जोशी, सैयामी खेर, उदित अरोरा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
advertisement
5/7
अग्निशमन दलातील अधिकारी विठ्ठल आणि त्याचा तापट मेहुणा समित, मुंबईतल्या आगीच्या रहस्यमय घटनांचा उलगडा कसा करतात हे 'अग्नी' दाखवण्यात येणार आहे.
advertisement
6/7
दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी तिने खास लूक केला होता. तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. यावेळी ती अतिशय सुंदर दिसत होती.
advertisement
7/7
तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तिने यावर मोत्याचे कानातले सोडता इतर कोणतेही दागिने घातले नव्हते. तरीही तिच्या सौंदर्यात कोणतीही कमतरता भासली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अग्नीचं फूल! गुलाबी साडीमध्ये सई ताम्हणकरचा कातिलाना अंदाज, खांद्यावरील टॅटू केला फ्लाँट