Tanaji Galgunde: 'तिचा एक सिनेमा आणि माझे 30...', 'सैराट' फेम तानाजी गळगुंडेचा धक्कादायक खुलासा; रिंकू राजगुरूबद्दल म्हणाला...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
'Sairat' fame Tanaji Galgunde: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तानाजीने आपल्या वाट्याला आलेल्या उपेक्षेचा आणि जवळच्याच लोकांनी केलेल्या फसवणुकीचा पाढा वाचला आहे.
advertisement
1/7

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'ने मराठी सिनेसृष्टीचा इतिहास बदलला. या सिनेमानं आर्ची-परशा दिलेच, पण त्यासोबत सल्या आणि बाळ्यासारखी पात्रंही प्रेक्षकांच्या काळजात घर करून गेली. आज रिंकू राजगुरूची ओळख केवळ सैराट चित्रपटातील आर्ची पर्यंत मर्यादित राहिलेली नाही.
advertisement
2/7
तिने ग्लॅमरच्या जगात स्वतःचं एक वेगळं साम्राज्य उभं केलं आहे. मात्र, याच सिनेमातून घराघरात पोहोचलेला 'बाळ्या' म्हणजेच अभिनेता तानाजी गळगुंडेला आजही संघर्ष करावा लागत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तानाजीने आपल्या वाट्याला आलेल्या उपेक्षेचा आणि जवळच्याच लोकांनी केलेल्या फसवणुकीचा पाढा वाचला आहे.
advertisement
3/7
एका मुलाखतीत तानाजीने इंडस्ट्रीतील एक दाहक वास्तव मांडलं. तो म्हणाला, "इंडस्ट्रीत मुख्य भूमिकेत असणाऱ्यांची आणि आमच्यासारख्या सहाय्यक कलाकारांची किंमत खूप वेगळी असते. रिंकूने स्वतःला खूप छान घडवलंय आणि तिची मार्केट व्हॅल्यूही मोठी आहे."
advertisement
4/7
तानाजी पुढे म्हणाला, "रिंकूचा एक सिनेमा आणि माझे ३० सिनेमे बरोबर आहेत. तिला वर्षातून एखादाच चांगला सिनेमा केला तरी चालतो, पण मला माझं घर चालवण्यासाठी छोटे-मोठे मिळेल ते काम करत राहावं लागतं." तानाजीच्या या बोलण्यातून कलाविश्वातील विषमतेचं चित्र स्पष्टपणे समोर आलं आहे.
advertisement
5/7
'सैराट' गाजल्यानंतर तानाजीकडे प्रसिद्धीसोबतच चांगलं मानधनही आलं होतं. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या तानाजीला अचानक मिळालेल्या या पैशांचं नियोजन कसं करायचं, याचं अज्ञान होतं. आणि याच आर्थिक अज्ञानाचा फायदा त्याच्याच जवळच्या मित्रमंडळींनी घेतला.
advertisement
6/7
तानाजीने अत्यंत भावूक होऊन सांगितलं की, "पैसे हातात आले की मित्र वाढतात, हे मला उशिरा कळलं. कुणी व्यवसाय सुरू करायला पैसे मागितले, कुणी 'पैसे वाढवून देतो' असं आमिष दाखवलं, तर कुणी घरगुती अडचणी सांगून उसने पैसे घेतले. मी मित्रांवर आंधळा विश्वास ठेवला आणि स्वतःकडे काहीही न ठेवता सर्व पैसे त्यांना देऊन टाकले." पण पैसे मिळताच त्या तथाकथित मित्रांनी तानाजीला ब्लॉक केलं आणि त्याचे फोन उचलणंही बंद केलं.
advertisement
7/7
आजही तानाजीला लोक 'बाळ्या' म्हणून ओळखतात, रस्त्यात गेल्यावर सेल्फी घेतात. पण या प्रसिद्धीच्या झगमगाटामागे पोटाची खळगी भरण्यासाठी सुरू असलेली ओढाताण केवळ त्यालाच माहीत आहे. जवळच्या लोकांकडून मिळालेल्या या धक्क्याने तानाजी आता सावरण्याचा प्रयत्न करत असला, तरी विश्वासाला तडा गेल्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tanaji Galgunde: 'तिचा एक सिनेमा आणि माझे 30...', 'सैराट' फेम तानाजी गळगुंडेचा धक्कादायक खुलासा; रिंकू राजगुरूबद्दल म्हणाला...