TRENDING:

Samantha Ruth Prabhu : 'आजारपणाबद्दल सांगायला मला भाग पाडलं...' समंथाचा शॉकिंग खुलासा

Last Updated:
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूनं मध्यंतरी ती मायोसायटिस या ऑटो इम्युन विकाराशी लढा देत असल्याचा खुलासा केला होता. आपल्याला हा विकार झाल्याचं निदान झाल्याचं समंथाने ऑक्टोबर 2022 मध्ये जाहीर केलं होतं. पण या आजारावर मात करत सामंथाने जोरदार कमबॅक केलं आहे. ती अनेक सिनेमात झळकली. पण आता समंथाने तिला या आजराविषयी बळजबरीनं बोलावं लागलं, असा खुलासा केला आहे. काय म्हणाली सामंथा जाणून घ्या.
advertisement
1/8
'आजारपणाबद्दल सांगायला मला भाग पाडलं...' समंथाचा शॉकिंग खुलासा
समंथा रुथ प्रभूनं ऑक्टोबर 2022 मध्ये तिला झालेल्या मायोसायटिस या आजाराविषयी खुलासा केला होता. त्यानंतर तिला चाहत्यांचा पाठींबा मिळाला, पण अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं.
advertisement
2/8
समंथा रुथ प्रभूचा चित्रपट 'यशोदा' 2022 मध्ये प्रदर्शित झाला. याचवेळी तिने आपल्याला मायोसिटिस आजार असल्याचं सांगितलं. आता नुकतंच 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत समंथानं, तिच्या 14 वर्षांच्या कारकिर्दीतील हे सर्वात दुःखी आणि वाईट वर्ष असल्याचं सांगितलं आहे.
advertisement
3/8
याविषयी बोलताना समंथा म्हणाली, 'माझ्या आजाराबद्दल मी काही सांगणार नव्हते, पण तसं करायला मला भाग पाडलं गेलं. त्यावेळी माझा स्त्रीकेंद्रित चित्रपट प्रदर्शित होणार होता. तेव्हाच मी खूप आजारी पडले होते.'
advertisement
4/8
ती पुढे म्हणाली, ''माझ्यासाठी तो काळ अवघड होता आणि मी कोणत्याच गोष्टीसाठी तयार नव्हते. माझ्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज वर्तवले जात होते आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात होत्या. सिनेमाच्या प्रमोशनसाठी निर्मात्यांना माझी गरज होती. त्यामुळे मी मुलाखत देण्यास होकार दिला.'' असा खुलासा तिने केला.
advertisement
5/8
समंथा पुढे म्हणाली, 'त्या मुलाखतीत मी जशी दिसले तशी नव्हते. स्वत:ला स्थिर ठेवण्यासाठी मी हाय पॉवरची औषधं घेतली होती. माझ्यावर तसं करण्यास जबरदस्ती केली गेली. माझ्याकडे दुसरा पर्याय असता तर मी कधीच जाहीरपणे येऊन ही घोषणा केली नसती.'' असं सामंथा म्हणाली आहे.
advertisement
6/8
समंथाने केलेल्या या खुलास्यानं सगळेच हैराण झाले आहेत.
advertisement
7/8
तसंच यानंतर समंथाने मला त्यानंतर 'सिम्पथी क्वीन' म्हटलं जात होतं आणि ट्रोल केलं जात होतं.' असा खुलासा देखील केला आहे.
advertisement
8/8
समंथा शेवटची विजय देवराकोंडा सोबत 'ख़ुशी' चित्रपटात दिसली होती. येणाऱ्या काळात ती वरुण धवनसोबत 'सिटाडेल' मध्ये झळकणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Samantha Ruth Prabhu : 'आजारपणाबद्दल सांगायला मला भाग पाडलं...' समंथाचा शॉकिंग खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल