TRENDING:

12 वर्षांची मैत्री, 4 महिने डेटिंग आणि थेट लग्नाची मागणी; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात

Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे.
advertisement
1/11
12 वर्षांची मैत्री, 4 महिने डेटिंग आणि थेट लग्नाची मागणी...
अभिनेता प्रसाद ओकच्या मुलाचा काही दिवसांआधीच साखरपुडा झाला. प्रसाद ओक सासरा झाला. लवकरच त्याचा मुलगा लग्नबंधनात अडकणार आहे. अशातच आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
advertisement
2/11
अभिनेत्रीचा थाटात साखरपुडा पार पडला आहे. लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीनं तिच्या बेस्ट फ्रेंडबरोबरच लग्न करायचं ठरवलं आहे.
advertisement
3/11
'श्यामची आई' या प्रसिद्ध मराठी सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा काटकर हिचा नुकताच साखरपुडा झाला.
advertisement
4/11
दिशाने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. दिशाच्या साखरपुड्याचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
5/11
सारंग नेरकर असं दिशाच्या होण्याऱ्या नवऱ्याचं नाव आहे. Engaged to my best decision! असं म्हणत दिशाने तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केलेत. अनेक कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
6/11
दिशाने आणखी एक पोस्ट इन्स्टा स्टोरीवर शेअर केली. ज्यात तिने त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं. दोघेही गेली 12 वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. 12 वर्षांच्या मैत्रीनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
7/11
"प्रेमापर्यंतचा प्रवास…12 वर्षांची मैत्री, 4 महिने डेटिंग आणि सहज आलेला होकार", असं कॅप्शन देत दिशाने दोघांचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. ज्यात सारंगने तिला उचलून घेतलं आहे.
advertisement
8/11
दिशा एक उत्तम अभिनेत्री आहे. अभिनयाबरोबर ती कॉन्टेट क्रिएटर म्हणूनही काम करते. सोशल मीडियावर तिची जरबदस्त फॅन फॉलोविंग आहे.
advertisement
9/11
कंगना रणौतची उत्तम मिमिक्री ती करते. दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या अनेक घडामोडींवर ती कॉमेडी व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या व्हिडीओना चाहत्यांची पसंती मिळते.
advertisement
10/11
[caption id="attachment_1562292" align="aligncenter" width="1600"] गेल्या काही महिन्यांत अनेक सेलिब्रेटींनी लग्न केलं आहे. अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांनी डिसेंबर महिन्यात लग्न केलं. दोघांच्या लग्नाची अजूनही चर्चा होतेय.</dd> <dd>[/caption]
advertisement
11/11
सहकुटुंब सहपरिवार फेम अभिनेत्री कोमल कुंभार हिने देखील डिसेंबर महिन्यात लग्न केलं. कोमल आणि गोकुळ यांनी खूप संघर्षातून लग्न केलं. 2019 मध्ये त्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं होतं. तेव्हा कोमलच्या कुटुंबाकडून लग्नाला विरोध होता. आजही ते तिच्याशी बोलत नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
12 वर्षांची मैत्री, 4 महिने डेटिंग आणि थेट लग्नाची मागणी; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल