TRENDING:

पुण्याचा कारभारी कोण होणार? भाजपकडून महापौरपदासाठी प्रबळ दावेदारांची नावं समोर, वाचा संपूर्ण यादी

Last Updated:
महानगर पालिकेचा निकाल लागल्यापासून पुण्याचा महापौर कोण होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अनेक नेत्यांनी महापौर पदाची वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग देखील लावली आहे.
advertisement
1/15
पुण्याचा कारभारी कोण होणार? भाजपकडून महापौरपदासाठी प्रबळ दावेदारांची नावं समोर
नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. १६५ सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत भाजपनं तब्बल ११९ जागा जिंकल्या आहेत. भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळालं आहे.
advertisement
2/15
निकाल लागल्यापासून पुण्याचा महापौर कोण होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अनेक नेत्यांनी महापौर पदाची वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग देखील लावली आहे.
advertisement
3/15
आज महापौर पदाची आरक्षण सोडत निघणार आहे, सकाळी अकरा वाजता ही सोडत निघाल्यानंतर महापौर कोण होणार? याचं चित्र स्पष्ट होईल. पण भाजपकडून जवळपास ११ नगरसेवक महापौर पदाच्या शर्यतीत आहेत.
advertisement
4/15
महापौर पदाच्या रेसमध्ये असणाऱ्यांमध्ये सहा महिला आणि पाच पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे. यात नेमका कुणाचा समावेश असणार आहे, पाहूयात...
advertisement
5/15
गणेश बीडकर- बीडकर हे पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख आहेत. ते २५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून त्यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे पूत्र प्रणव धंगेकर यांचा पराभव केला.
advertisement
6/15
श्रीनाथ धमाले- प्रभाग क्रमांक ३९ मधून धमाले यांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली आहे.
advertisement
7/15
किरण दगडे पाटील- युवा नेते आणि डॅशींग कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे किरण दगडे पाटील प्रभाग क्रमांक ३३ मधून निवडणूक जिंकली आहे.
advertisement
8/15
रंजना टिळेकर- रंजना टिळेकर यांनी प्रभाग क्रमांक ४० (कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी) मधून विजय मिळवला आहे. त्यांनी या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांचे पुत्र रुपेश मोरे यांचा पराभव केला.
advertisement
9/15
रोहिणी चिमटे- या प्रभाग क्रमांक २९ (खराडी - मांजरी बुद्रुक) मधून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत.
advertisement
10/15
राजेंद्र शिळीमकर हे प्रभाग क्रमांक २० (बिबेवाडी - शंकर महाराज मठ) मधून भाजपकडून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांना केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे अत्यंत विश्वासू आणि खंदे समर्थक मानले जाते.
advertisement
11/15
मंजुषा नागपुरे या अनुभवी नेत्या असून त्यांनी यापूर्वीही पुणे महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून काम केले आहे. सिंहगड रोड परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्या इथून बिनविरोध निवडून आल्या आहेत.
advertisement
12/15
धीरज घाटे हे पुण्याच्या राजकारणातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) अत्यंत महत्त्वाचे नेते आणि सध्याचे पुणे शहराध्यक्ष आहेत. ते सध्या महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या नावांपैकी एक आहेत. ते प्रभाग क्रमांक २७ (नवी पेठ - पर्वती) मधून भाजपच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या संपूर्ण पॅनेलने (अमर आवळे, स्मिता वस्ते आणि लता गौड) या प्रभागात दणदणीत विजय मिळवला आहे.
advertisement
13/15
वीणा घोष या प्रभाग क्रमांक ३६ (धायरी - नऱ्हे) मधून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत.
advertisement
14/15
प्राची आल्हाट या प्रभाग क्रमांक ४१ (महंमदवाडी - कौसरबाग) मधून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
advertisement
15/15
मृणाल कांबळे या प्रभाग क्रमांक २२ (काशेवाडी - डायस प्लॉट) मधून भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या सून आणि अविनाश बागवे यांच्या पत्नी इंदिरा बागवे यांचा पराभव केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
पुण्याचा कारभारी कोण होणार? भाजपकडून महापौरपदासाठी प्रबळ दावेदारांची नावं समोर, वाचा संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल