'Kissing Scene साठी मी नाही म्हणणार नाही पण...', श्रिया पिळगावकर थेटच बोलली
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shriya Sachin Pilgaonkar on Kissing Scene : अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने वेब सीरिज आणि सिनेमातील किसींग सीन्स आणि बोल्ड सीन्सविषयी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
advertisement
1/7

अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिंदी सिनेमा आणि ओटीटी माध्यमातून नाव कमावतेय. अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी असून तिने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
advertisement
2/7
श्रिया ओटीटी माध्यमांमध्ये वेगवेगळ्या भुमिकांमध्ये दिसतेय. बोल्ड सीन्स देखील ती बिनधास्त करताना दिसतेय. एका मुलाखतीत श्रियानं बोल्ड सीन्स, आई-वडिलांचा पाठिंबा याविषयी बोलली.
advertisement
3/7
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत श्रियाने बोल्ड सीन्सबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं. ती म्हणाली, "माझ्या मते, ऑफस्क्रीन संस्कार हे ऑनस्क्रीन संस्कारांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. मला स्वतःच्या ऑनस्क्रीन संस्कारांवर विश्वास आहे."
advertisement
4/7
"कलाकार म्हणून मी स्वत:वर मर्यादा घालू शकते असं मला वाटत नाही. किंवा तसं करणंही योग्य वाटत नाही. काळानुसार गोष्टी मांडण्याची पद्धत बदलली आहे. कामातील मर्यादा आणि सहजता देखील पूर्वीपेक्षा वेगळी झाली आहे".
advertisement
5/7
श्रिया म्हणाली, "लव्हस्टोरी म्हटल्या की मुलगा-मुलगी हे किस करताना दाखवले जातात. अशा सीनसाठी मी नाही म्हणणार नाही. हो पण ते पडद्यावर कसे दाखवले जाणार आहेत, त्यामागची भावना काय आहे हे महत्त्वाचं आहे. मला ते कळतं आणि त्यानुसार मी भूमिका स्वीकारते".
advertisement
6/7
बोल्ड सीन्सबद्दल बोलताना श्रिया म्हणाली, "एखाद्या सीरिजमधील बोल्ड सीनमुळे त्याचं थेट मूल्यमापन करू नये. कारण ती त्या-त्या कथेची गरजही असते. अशा सीनमागची तुमचा हेतु महत्त्वाचा आहे, असं मला वाटतं. आणि यासाठी आई-वडील मला नेहमीच पाठींबा देतात. पण त्यांना माहीत आहे की, मलाही ते निर्णय घेण्याचं स्वतंत्र आहे. पण इंटरनेटवर काहीही होऊ शकतं. फेक व्हिडीओ वगैरे काहीही होऊ शकतं".
advertisement
7/7
श्रिया पिळगावकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, तिची 'छलकपट' नावाची वेब सीरिज 5 जून 2025 रोजी रिलीज झाली आहे. ZEE5 वर ही सीरिज तुम्हाला पाहायला मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'Kissing Scene साठी मी नाही म्हणणार नाही पण...', श्रिया पिळगावकर थेटच बोलली