Shweta Tiwari : कोट्यवधींची मालकीण आहे श्वेता तिवारी, अभिनेत्रीची पहिली कमाई किती होती माहितीये?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shweta Tiwari Net Worth: टीव्हीच्या दुनियेत 'श्वेता तिवारी' या नावाला ओळखीची गरज नाही. हे नाव ऐकताच एका सुंदर अभिनेत्रीचा हसरा चेहरा समोर येतो. 44 वर्षांची ही अभिनेत्री अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वाचा एक भाग आहे. आधीच्या तुलनेत श्वेताच्या लूक आणि स्टाइलमध्ये खूप बदल झाला आहे. श्वेता आणि अभिनेता विशाल आदित्य सिंह यांच्या लग्नाचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे श्वेता तिवारी चांगलीच चर्चेत आली होती. यानिमित्ताने श्वेता तिवारीबद्दल काही अधिक माहिती जाणून घेऊया. तिची संपत्ती तरी किती हेही पाहू.
advertisement
1/8

श्वेता तिवारीचा जन्म 4 ऑक्टोबर 1980 रोजी प्रतापगड, उत्तर प्रदेश येथे झाला. श्वेताने मॉडेलिंगनंतर टीव्हीच्या दुनियेत आपल्या करिअरला सुरुवात केली. श्वेता पहिल्यांदा 2000 मध्ये 'आने वाला पल' या शोमध्ये दिसली होती. यानंतर त्याने 'कलीरें', 'कर्म' आणि 'कहीं किसी रोज'सारखे शो केले.
advertisement
2/8
2001 मध्ये श्वेता तिवारीला टीव्ही शो 'कसौटी जिंदगी की' करण्याची संधी मिळाली. एकता कपूरच्या या शोमध्ये ती 'प्रेरणा'च्या भूमिकेत दिसली होती. अनुराग बसू आणि प्रेरणा यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांना मनापासून आवडली.
advertisement
3/8
'कसौटी जिंदगी की' मुळे श्वेता तिवारी घराघरात प्रसिद्ध झाली. तिचे ते मोठे डोळे आणि सुंदर स्माइल यामुळे ती सगळ्यांच्या लक्षात राहिली. या शोममुळे श्वेता तिवारीला टेलिव्हिजन विश्वात एक स्वतंत्र ओळख मिळाली.
advertisement
4/8
एक अभिनेत्री म्हणून श्वेताने स्वत:मध्ये खूप बदल केले. तिची प्रत्येक भुमिका तिने मनापासून करत त्याला न्याय दिला. यानंतर श्वेताने 'झलक दिखला जा', 'नच बलिये', 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी' यांसारख्या रिॲलिटी शोमध्ये तिचा वेगळा लूक दाखवला.
advertisement
5/8
श्वेता तिवारीने तिच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 'परवरिश', 'बेगुसराय' आणि 'मेरे डॅड की दुल्हन' सारखे शो केले आणि ती एक अभिनेत्री म्हणून अधिक परिपक्व दिसली. यासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही बरेच बदल पाहायला मिळाले. श्वेता पूर्वीपेक्षा सुंदर दिसू लागली आणि तिची फॅन फॉलोइंगही वाढली.
advertisement
6/8
श्वेताच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ते नेहमीच संकटांनी भरलेले होते. तिचा पहिला पती राजा चौधरीसोबतचा संसार मोडला. 2019 मध्ये तिचा दुसरा पती अभिनव कोहली याच्याशी घटस्फोट झाला. श्वेताला रेयांश कोहली आणि पलक तिवारी अशी दोन मुले आहेत.
advertisement
7/8
जरी श्वेता तिवारीला तिच्या वैयक्तिक आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागला, तरीही ती नेहमीच एक बॉस लेडी म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. मनोरंजनाच्या विश्वातील तिचं नाणं आजही चालू आहे. मीडिया रिपोर्टनुसार श्वेताची एकूण संपत्ती 52 कोटी रुपये आहे. ती मालिकेच्या एका एपिसोडसाठी 4 ते 5 लाख रुपये मानधन घेते.
advertisement
8/8
श्वेताने 12 व्या वर्षी पहिलं काम केलं. तेव्हा तिची पहिली कमाई तिला 500 रुपये मिळाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shweta Tiwari : कोट्यवधींची मालकीण आहे श्वेता तिवारी, अभिनेत्रीची पहिली कमाई किती होती माहितीये?