TRENDING:

कोणी इंजिनिअर, तर कोणी CA! 'तारक मेहता...' मधील कलाकारांकडे बड्या बड्या डिग्री, एकाने तर सोडली दुबईमधली नोकरी

Last Updated:
TMKOC Cast Education: पडद्यावर साधेभोळे दिसणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यात खूप शिकलेले आहेत. कोणाकडे इंजिनिअरिंगची डिग्री आहे, तर कोणी चक्क चार्टर्ड अकाउंटंट होणार होतं.
advertisement
1/8
कोणी इंजिनिअर, तर कोणी CA! 'तारक मेहता...' मधील कलाकारांकडे बड्या बड्या डिग्री
गेल्या १७ वर्षांपासून एकच मालिका टॉपला आहे ती म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. जेठालाल, पोपटलाल किंवा भिडे मास्टर असो, प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.
advertisement
2/8
१७ वर्षे झाली असली तरीही ही मालिका टीआरपी लिस्टच्या टॉप ५ सिरिअलमध्ये आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, पडद्यावर साधेभोळे दिसणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यात खूप शिकलेले आहेत. कोणाकडे इंजिनिअरिंगची डिग्री आहे, तर कोणी चक्क चार्टर्ड अकाउंटंट होणार होतं.
advertisement
3/8
'गोकुळधाम'चे एकमेव सेक्रेटरी आणि शिस्तीचे कडक 'भिडे मास्टर' खऱ्या आयुष्यातही तितकेच हुशार आहेत. मंदार चांदवडकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी ते दुबईमध्ये एका मोठ्या कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरी करत होते. पण आपल्या आवडीसाठी त्यांनी चक्क दुबईची आलिशान नोकरी सोडली आणि आज ते घराघरात 'भिडे मास्तर' म्हणून ओळखले जातात.
advertisement
4/8
'पत्रकार पोपटलाल' खऱ्या आयुष्यात चक्क चार्टर्ड अकाउंटंट होण्याची तयारी करत होते. श्याम पाठक यांनी 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स'मधून शिक्षण घेतलंय. पण या क्षेत्रात नशीब आजमावण्यापेक्षा त्यांनी अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली. आज ते अविवाहित पोपटलाल म्हणून सर्वांचे मनोरंजन करत आहेत.
advertisement
5/8
'जेठालाल' म्हणजेच लोकप्रिय अभिनेते दिलीप जोशी यांनी 'बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन' (BCA) ही पदवी घेतली आहे. इतकंच नाही तर त्यांनी अर्थशास्त्र विषयातही रस घेतला होता. पण आता जेठालाल म्हणून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
advertisement
6/8
जेठालालचे 'बापूजी' म्हणजेच अमित भट्ट हे खऱ्या आयुष्यात जेठालालपेक्षा वयाने लहान असून त्यांनी कॉमर्समध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहेत.
advertisement
7/8
जेठालालची लाडकी बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता फक्त तिच्या सौंदर्यासाठीच नाही, तर तिच्या शिक्षणासाठीही प्रसिद्ध आहे. मुनमुनने इंग्लिश लिटरेचरमध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे.
advertisement
8/8
'हे मां माताजी' म्हणत प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या दिशा वकानीने अहमदाबादमधून नाट्यशास्त्र आणि अभिनयात पदवी घेतली आहे. त्यानंतर अनेक वर्ष तिने थिएटर केलं, ज्यामुळे तिच्या अभिनयातील परिपक्वता वाढत गेली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोणी इंजिनिअर, तर कोणी CA! 'तारक मेहता...' मधील कलाकारांकडे बड्या बड्या डिग्री, एकाने तर सोडली दुबईमधली नोकरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल