TRENDING:

सुपरस्टारच्या घरी आनंदी आनंद! अडीच वर्षांत झाला 3 मुलांचा बाबा; बायकोने आता दिला जुळ्यांना जन्म

Last Updated:
Ramcharan Upasna Welcome Twins : सुपरस्टार अभिनेत्याच्या लग्नाला 14 वर्षे झाली त्यानंतर 2023 साली त्यांच्या कुटुंबात गूड न्यूज आली आणि आता त्यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा त्याने डबल गूड न्यूज दिली आहे.
advertisement
1/5
सुपरस्टारच्या घरी आनंदी आनंद! अडीच वर्षांत 3 मुलांचा बाबा; आता जुळ्यांचा जन्म
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणच्या कुटुंबाने गूड न्यूज दिली आहे. राम चरण दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी उपासनाने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.
advertisement
2/5
राम चरणचे वडील चिरंजीवी यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्यांनी रामचरण आणि उपासना यांना एक मुलगा आणि मुलगी झाल्याचं सांगितलं आहे. तसंच आई आणि बाळ दोघंही निरोगी असल्याचं त्यांनी सांगितलं.
advertisement
3/5
रामचरण आणि उपासना यांनी 2012 साली लग्न केलं होतं. उपासना ही अपोलो चॅरिटीची उपाध्यक्ष आहे. त्यांचं लग्न झालं तेव्हा ती फक्त 23 वर्षांची होती.
advertisement
4/5
राम चरण आणि उपासना नववीपासून एकत्र शिकत होते. त्यानंतर दोघांचंही एकमेकांवर प्रेम जडलं. डिसेंबर 2011 साली साखरपुडा आणि 14 जून 2012 साली त्यांचं लग्न झालं.
advertisement
5/5
लग्नानंतर 14 वर्षांनी 20 जून 2023 रोजी त्यांना पहिलं मूल झालं. त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. त्यानंतर आता अडीच वर्षांनी ते दोघं पुन्हा एकदा आईवडील बनले आहेत, यावेळी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. त्यामुळे सेलिब्रिटी आणि चाहत्यांना त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (सर्व फोटो : फाइल)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुपरस्टारच्या घरी आनंदी आनंद! अडीच वर्षांत झाला 3 मुलांचा बाबा; बायकोने आता दिला जुळ्यांना जन्म
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल