राया-मंजिरीची पहिली मकर संक्रांत, काव्याच्या क्यूट लूकने जिंकली चाहत्यांची मनं, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मालिका विश्वातही मकरसंक्रांत पार पडली. स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये नायिकांचे मकर संक्रांतीचे लूक पाहिले का?
advertisement
1/7

महाराष्ट्राची नंबर वन मालिका ठरल तर मग मध्येही सायली आणि अर्जून यांनी मकरसंक्रांती साजरी केली. सायली आणि अर्जून काळ्या कपड्यांमध्ये खूपच शोभून दिसत होते.
advertisement
2/7
तू ही रे माझा मितवा मालिकेतील अर्णव आणि ईश्वरी यांचीही पहिली मकरसंक्रांत आहे. ईश्वरी अर्णवचं मन जिंकण्यात यशस्वी होणार, दोघे एकत्र मकरसंक्रांती साजरी करताना दिसणार आहेत.
advertisement
3/7
आपली माणसं मालिकेतील सत्या आणि धुमकेतू यांनीही मकरसंक्रांत साजरी केली. धुमकेतूही काळ्या रंगाच्या साडीत आणि हलव्याच्या दागिन्यात खूप सुंदर दिसतेय.
advertisement
4/7
यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतलं ते राया-मंजिरीच्या पहिल्याच मकर संक्रांतीनं. नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही जोडी सणाच्या दिवशी अधिकच खास दिसत होती. पारंपरिक लूकमध्ये राया आणि मंजिरीची केमिस्ट्री चाहत्यांना भावली. दोघांनी एकत्र पतंग देखील उडवला.
advertisement
5/7
यावेळी सगळ्या नायिकांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधलं ते म्हणजे काव्याने. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतही काव्या-पार्थ आणि नंदिनी जिवा यांची पहिली संक्रांत आहे.
advertisement
6/7
काव्यानं देखील काळी साडी आणि हलव्याचे दागिने परिधान केले. काव्या या लूकमध्ये खूपच क्यूट दिसते चाहत्यांनाही काव्याचा लूक आवडला.
advertisement
7/7
कलाकारांनी सण साजरा करताना परंपरा जपत, आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. या संक्रांतीनिमित्त सेटवरचं आनंदी वातावरण आणि कलाकारांची बॉन्डिंग पाहून प्रेक्षकांनीही या खास क्षणांचा मनमुराद आनंद घेतला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राया-मंजिरीची पहिली मकर संक्रांत, काव्याच्या क्यूट लूकने जिंकली चाहत्यांची मनं, PHOTO