सुरुवातीला सस्पेन्स थ्रीलर शेवटी बनते हॉरर; OTT वरील या फिल्मचा क्लाइमॅक्स पाहून अंगावर काटाच येईल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Best Horror Film On OTT: एकदा ही फिल्म पाहायला तुम्ही सुरुवात केली की शेवटपर्यंत उठायचं बिलकुल मन करणार नाही. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी अशी ही फिल्म आहे.
advertisement
1/6

ओटीटीवर बऱ्याच फिल्म आहेत. काही कॉमेडी, काही रोमँटिक, काही सस्पेन्स थ्रीलर तर काही हॉरर. पण एक अशी फिल्म जी सुरुवातीला सस्पेन्स थ्रीलर आहे पण त्याचा शेवट मात्र हॉरर आहे. 2025 मध्ये रिलीज झालेली ही फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्मवर खळबळ माजवत आहे.
advertisement
2/6
चित्रपटाची सुरुवात दहशतवादासाठी मुलांना कसे भडकवतात आणि नंतर 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार यापासून सुरू होते. नंतर फिल्मध्ये मुलं रहस्यरित्या गायब होत असतात. एका प्रामाणिक आणि धाडसी पोलीस अधिकाऱ्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला जातो.
advertisement
3/6
सर्वात आधी एका माजी आमदाराचा मुलगा अचानक गायब होतो. सुरुवातीला पोलिसाला हे एखाद्या दहशतवादी गटाचं काम असल्याचा संशय येतं. जसजसा तो अधिक खोलात जातो, तसतशी आणखी रहस्ये समोर येतात
advertisement
4/6
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आणखी मुलं गायब होतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गायब झालेली सर्व मुलं एकाच शाळेतील आहेत.
advertisement
5/6
हा 2025 सालचा सर्वोत्कृष्ट सस्पेन्स थ्रीलर मानला जातो, ही फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरुवातीला ट्रेंडिगवर होती. आयएमडीबवर 7.1 रेटिंग आहे. याचा क्लायमॅक्स तुम्हाला थक्क करून सोडेल. सुरुवातीला तो एक सस्पेन्स थ्रीलर वाटतो, पण अचानक तो हॉरर चित्रपटात बदलतो.
advertisement
6/6
काश्मीर खोऱ्यातील ही घटना. बारामुल्ला इथं घडणारा एक रहस्यमय थ्रीलर आहे. फिल्मचं नाव आहे बारामुल्ला. आदित्य सुहास जांबळे यांनी दिग्दर्शित केलेली ही फिल्म. तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुरुवातीला सस्पेन्स थ्रीलर शेवटी बनते हॉरर; OTT वरील या फिल्मचा क्लाइमॅक्स पाहून अंगावर काटाच येईल