TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : 'त्याच्यासाठी मनात एक सॉफ्ट कॉर्नर', कुणाबाबत बोलतेय अनुश्री, मनातलं सगळं सांगितलं

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Anushree Mane : बिग बॉस मराठी 6 च्या घरातील त्या सदस्याबाबत अनुश्री मानेच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण झाली आहे. याबाबत ती व्यक्त झाली आहे.
advertisement
1/7
BBM6 : 'त्याच्यासाठी मनात एक सॉफ्ट कॉर्नर', कुणाबाबत बोलतेय अनुश्री, मनातलं सगळं सांगितलं
बिग बॉस मराठी 6 च्या घरात अनुश्री माने सगळ्यात स्ट्राँग स्पर्धकांपैकी एक मानली जाते. बिग बॉसच्या घरात येताच ती सगळ्यांच्या नजरेत आली होती. ते तिच्या वागण्यामुळे. अनुश्री म्हणजे उद्धट, उलट उत्तरं करणारी, काहीही बोलणारी अशी तिची प्रतिमा झाली.
advertisement
2/7
अनुश्रीचं वागणं पाहून रितेश देशमुखनेही तिचे कान टोचले होते. यानंतर मात्र अनुश्रीने स्वत:मध्ये बदल केला आणि तिचा खेळणं सगळ्यांना आवडू लागलं. ती गेम चांगले खेळू लागली आणि आपल्या ग्रुपचं चुकलं तर तिथंही बोलू लागली. तिने टोळीही सोडली होती.
advertisement
3/7
बिनधास्त वाटणारी अनुश्री बिग बॉसच्या घरात खूप वेळा इमोशनल झाली आहे, रडली आहे. काही दिवसांपूर्वीच राखी तिला नको नको ते म्हणाली तेव्हा ते तिच्या जिव्हारी लागलं होतं.
advertisement
4/7
तसंच एका टास्कमध्ये आईचं पत्र वाचायला न मिळाल्याने ती खूप रडली होती. खूप आधी तिने राकेशमध्ये आपले वडील दिसत असल्याचं सांगत ती इमोशनल झाली होती.
advertisement
5/7
आता घरातील एका सदस्याच्या बाबतीत अनुश्रीने आपल्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर असल्याचं सांगितलं आहे. तिने सगळ्यांसमोरच आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
6/7
कॅप्टन कुणाला करायचं यावरून अनुश्री, सागर, संकेत आणि विशाल यांच्यात चर्चा चालू होती. तेव्हा विशाल प्रभूला नाही तर राखीला कॅप्टन करायचं असं सांगतो. यावर अनुश्री आधी संस्कृती, मग राखी आणि नंतर प्रभू असं कॅप्टन बनवूया असं म्हणते.
advertisement
7/7
पण विशाल आणि सागर प्रभूच्या नावाला सगळ नकार देतात. इमोशनली विचार करू नको, असं सांगतात. यावेळी अनुश्री त्याच्याबाबत एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाल्याचं सांगते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : 'त्याच्यासाठी मनात एक सॉफ्ट कॉर्नर', कुणाबाबत बोलतेय अनुश्री, मनातलं सगळं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल