TRENDING:

Pune Crime : दहिवडीतील 12 वर्षाच्या मुलाच्या हत्याकांडाचा अखेर उलगडा, लैंगिक अत्याचारातून खून! आरोपीची धक्कादायक कबुली

Last Updated:

Pune Shirur Murder Case : पुण्याच्या शिरूर तालुक्यातील दहिवडी येथील अल्पवयीन मुलाचा खून हा लैंगिक अत्याचारातून केल्याची धक्कादायक कबुली आरोपीने दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी येथील मांजरेवस्ती येथे 12 वर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. साईराज गणेश मांजरे असं खून झालेल्या बालकाचं नाव होतं. या घटनेनंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाल्याचं समोर आलं. 12 वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, अखेर ही हत्या असल्याचं तपासात समोर आलं. त्यानंतर आता 24 तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत अक्षय मांजरे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
Pune Crime Murder of 12 Year Old Boy in Dahivadi Finally Solved
Pune Crime Murder of 12 Year Old Boy in Dahivadi Finally Solved
advertisement

आरोपीने गुन्हा कबूल केला

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दहिवडी गावात एका निष्पाप मुलाचा बळी घेण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण होते. मात्र, आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्याने पोलिसांचं कौतुक केलं जातंय. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

advertisement

Pune Crime : दहिवडीतील प्रकरणावर पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा खळबळजनक खुलासा, वर्षभरापूर्वी असंच झालं होतं!

आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणात एक नवा खुलासा समोर येत आहे. याच गावात 21 महिन्यांपूर्वी एका 10 वर्षांच्या मुलाची अशाच प्रकारे हत्या झाली होती. दोन्ही घटनांमधील साम्य पाहता, आरोपी अक्षय मांजरे यानेच ती हत्या केली असावी का, यादृष्टीने पोलीस आता सखोल तपास करत आहेत. या प्रकरणातील तपासा नंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

advertisement

21 महिन्यापूर्वी झालेली हत्या कुणी केली? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रस्त्यावर पैसे मागितले, पण शेवटी ठरवलं अन् ट्रान्सजेंडर मनस्वीनं करून दाखवलं, VIDEO
सर्व पहा

दरम्यान, पीडित मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. आता 21 महिन्यापूर्वी याच गावात झालेली दहा वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या याच आरोपीने केली असल्याची प्राथमीक माहिती समोर येत असून त्या अनुशंगाने शिक्रापूर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : दहिवडीतील 12 वर्षाच्या मुलाच्या हत्याकांडाचा अखेर उलगडा, लैंगिक अत्याचारातून खून! आरोपीची धक्कादायक कबुली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल