TRENDING:

टीव्हीवर मिळेना काम, 'तारक मेहता' फेम अभिनेत्रीनं सुरु केला बिझनेस; आता कमावतेय कोट्यवधी रुपये

Last Updated:
टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध मालिकांमध्ये 'तारक मेहता का उलटा चश्मा' या मालिकेचं नाव अग्रणी येतं. या मालिकेतील अनेक अभिनेत्रींनी एक्झिट घेतली असून ते दुसरं काम करताना दिसत आहेत. आज आम्ही याच मालिकेतील एका अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत जिने या मालिकेनंतर इंडस्ट्रीला रामराम केला. आता ती बिझनेसवुमन झाली असून कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.
advertisement
1/8
टीव्हीवर मिळेना काम, मग सुरु केला बिझनेस; आता कोट्यवधी कमावतेय अभिनेत्री
आज आम्ही याच मालिकेतील एका अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत जिने या मालिकेनंतर इंडस्ट्रीला रामराम केला. आता ती बिझनेसवुमन झाली असून कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.
advertisement
2/8
ही अभिनेत्री म्हणजे सिंपल कौल. ती 'तारक मेहता का उलटा चश्मा' आधी 'शरारत' या मालिकेतून प्रसिद्ध झाली. सिंपल कौलने शरारत नंतर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
advertisement
3/8
या यादीत 'कुसुम', 'कुटुंब', 'ये मेरी लाइफ है', 'खिचडी' आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकांचा समावेश आहे. शरारतमधील पॅमच्या भूमिकेमुळे अभिनेत्रीला ओळख मिळाली. मात्र या मालिकांमध्ये काम केल्यानंतर ही अभिनेत्री टीव्हीवर दिसली नाही.
advertisement
4/8
सिंपल कौलला टीव्हीवर ओळख मिळाली पण हळूहळू तिला काम मिळणं बंद झालं आणि ती टीव्हीपासून दूर गेली.
advertisement
5/8
मात्र ही अभिनेत्री बिझनेसवुमन बनली आहे. सिंपल तिच्या व्यवसायातून करोडो रुपये कमावत आहे. सिंपल कौल अनेक रेस्टॉरंटची मालकीण आहे.
advertisement
6/8
सिंपलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. ती म्हणाली, 'मी टीव्हीवर खूप काम केलं आहे, पण मी एका चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात आहे.'
advertisement
7/8
'मी बॉलीवूड आणि ओटीटीमध्येही अभिनय करायला तयार आहे. मी अभिनय पूर्णपणे सोडला नाहीये पण घर चालवण्यासाठी मी रेस्टॉरंटचा व्यवसाय सुरू केला.' अशी माहिती तिने दिली आहे.
advertisement
8/8
ती म्हणाली, 'मी सध्या अनेक रेस्टोरंटवर काम करते. सध्या माझं लक्ष व्यवसायावर आहे. पण भविष्यात मला चांगली भूमिका मिळाली तर मी ती नक्कीच करेन.' अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
टीव्हीवर मिळेना काम, 'तारक मेहता' फेम अभिनेत्रीनं सुरु केला बिझनेस; आता कमावतेय कोट्यवधी रुपये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल