TRENDING:

या आठवड्यात OTT विसरा, लाँग वीकेंडच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज होतायत 6 जबरदस्त फिल्म

Last Updated:
Theatre Releases January Third Week : जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी थिएटरमध्ये बॉलिवूड, साऊथ ते हॉलिवूडच्या अनेक फिल्म रिलीज होत आहेत.
advertisement
1/7
थिएटरमध्ये लाँग वीकेंडच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज होतायत 6 जबरदस्त फिल्म
सिनेमा प्रेमींना नवीन चित्रपटांची नेहमीच उत्सुकता असते. यंदा जानेवारीचा तिसरा आठवडा खूपच धमाकेदार ठरणार आहे. कारण या आठवड्यात थिएटरमध्ये अनेक रंजक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये एक कोरियन ड्रामा, एक प्रसिद्ध बॉलिवूडपटाचा सिक्वेल, एक मल्याळम चित्रपट आणि काही हॉलिवूड चित्रपटांचा समावेश आहे.
advertisement
2/7
बॉर्डर 2 (Border 2) : 1997 मधील कल्ट अ‍ॅक्शन चित्रपट बॉर्डरचा सिक्वेल 'बॉर्डर 2'मध्ये सनी देओल पुन्हा एकदा लेफ्टनंट कर्नल फतेह सिंह कलेर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 1971 च्या युद्धात भारतीय लष्कराने दिलेल्या लढ्याची ही कथा आहे, ज्यामध्ये लष्कर, नौदल आणि वायुदल यांनी एकत्र येऊन देशाचे संरक्षण कसे केले हे दाखवले आहे. हा चित्रपट तीन तरुणांवर केंद्रित आहे, जे शत्रूच्या भीषण आणि दीर्घकाळ चाललेल्या हल्ल्यांनाही धैर्याने सामोरे जातात. अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मोना सिंग, अन्या सिंग आणि मेधा राणा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट 23 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
advertisement
3/7
प्रोजेक्ट वाय (Project Y) : 30व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्क्रीनिंग झाल्यानंतर 'प्रोजेक्ट वाय'च्या थिएटर रिलीजकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा चित्रपट मी सन आणि दो क्यूंग या दोन जिवलग मैत्रिणींची कथा सांगतो, ज्या त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाचा सामना करत आहेत. प्रत्येक वळणावर त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांच्या मैत्रीची आणि एकमेकींवरील निष्ठेची परीक्षा होते. त्यांच्यापैकी कोणी एक दुसरीला फसवेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ली ह्वान दिग्दर्शित या चित्रपटात हान सो ही, जिऑन जोंग सियो, किम शिन रोक, जंग यंग जू, ली जे क्यून, यूओए आणि किम सुंग चेओल महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. हा क्राइम अ‍ॅक्शन कोरियन ड्रामा चित्रपट 21 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
advertisement
4/7
चथा पचा: द रिंग ऑफ राउडीज (Chatha Pacha : The Ring of Rowdies) : फोर्ट कोच्चीमध्ये WWE सारख्या वातावरणात काही माजी कैदी एकत्र येऊन ताकदवान पहलवानांचा एक गट तयार करतात. सुरुवातीला जगासाठी अनोळखी असलेले हे लोक लवकरच अ‍ॅक्शनप्रेमी प्रेक्षकांचे लाडके बनतात. मात्र नंतर त्यांच्या निष्ठेची आणि संयमाची कसोटी लागते. कारण क्षणात भाऊबंदकी शत्रुत्वात बदलते आणि पैशांचा खेळ सुरू होतो. अद्वैत नायर दिग्दर्शित या अ‍ॅक्शन कॉमेडी मल्याळम चित्रपटात रोशन मॅथ्यू, अर्जुन अशोकन, विशाख नायर, इशान शौकत, सिद्दीकी, लक्ष्मी मेनन, रफी, कार्मेन एस. मॅथ्यू, डार्टांगनान साबू आणि ममूटी महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. हा चित्रपट 22 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
advertisement
5/7
मार्टी सुप्रीम (Marty Supreme) : टिमोथी चालमेटने आपल्या लोकप्रिय प्रोजेक्टपैकी एक मार्टी सुप्रीममध्ये मार्टी माउझरची भूमिका साकारली आहे. हा 1950 च्या दशकातील एक पिंग-पोंग खेळाडू आहे, जो मोठं नाव कमावण्याचं स्वप्न पाहतो. मात्र आर्थिक अडचणी असूनही कठोर सराव करूनही स्वप्नं सहज पूर्ण होत नाहीत. त्याला साथ देणारा कोणीही नसल्यामुळे उपजीविकेसाठी तो वेगवेगळ्या लोकांशी, जोडला जातो. या हॉलीवूड स्पोर्ट्स कॉमेडी-ड्रामाचे दिग्दर्शन जोश सफ्डी यांनी केले आहे. चित्रपटात टिमोथी चालमेट, ग्वेनेथ पॅल्ट्रो, ओडेसा एझियन, केविन ओ’लेरी, टायलर ओकोनमा, एबेल फेरारा आणि फ्रॅन ड्रेशर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
advertisement
6/7
मर्सी (Mercy) : 'मर्सी' हा चित्रपट भविष्यकालीन AI च्या शक्यतांवर आधारित आहे. एका गुप्तहेरावर त्याच्या पत्नीच्या हत्येचा आरोप आहे आणि तो खटल्यात अडकलेला आहे. त्याच्यासमोर कोणताही सरकारी वकील किंवा बचाव पक्षाचा वकील नाही, तर AI ने सज्ज असा एक न्यायाधीश आहे, ज्याच्यासमोर तो अपील करतो आहे. क्रिस रेव्हनला अशा यंत्रणेविरुद्ध स्वतःचा बचाव करावा लागतो. मात्र अडचण अशी आहे की फाशी होण्यापूर्वी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे फक्त 90 मिनिटांचा वेळ आहे. तिमूर बेकमंबेटोव्ह यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सायन्स फिक्शन चित्रपटात क्रिस प्रॅट, रेबेका फर्ग्युसन, अ‍ॅनाबेले वॉलिस आणि काइली रॉजर्स यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
advertisement
7/7
रिटर्न टू सायलेंट हिल (Return To Silent Hill) : प्रसिद्ध व्हिडिओ गेम सायलेंट हिलवर आधारित 'रिटर्न टू सायलेंट हिल' हा चित्रपट सायलेंट हिल सिनेमाचा तिसरा भाग आहे. मुख्य पात्र जेम्स सुंदरलँड पुन्हा एकदा त्या रहस्यमय टेकडीकडे परततो, जी गेम आणि चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. यावेळी त्याच्यासमोर त्याच्या गर्लफ्रेंडला वाचवण्याचं एक मोठं आव्हान आहे. तिच्या शोधात असताना त्याला अनेक अडचणी, विचित्र प्राणी आणि भयावह वातावरणाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे हे सगळं खरंच आहे की भ्रम आहे, असा प्रश्न त्याला पडतो. तो आपल्या जोडीदाराला वाचवू शकेल का? हे तर चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. या चित्रपटात जेरेमी इरविन, हॅना एमिली अँडरसन आणि ईव्ही टेम्पलटन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. क्रिस्तोफ गान्स दिग्दर्शित हा सुपरनॅचरल सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
या आठवड्यात OTT विसरा, लाँग वीकेंडच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज होतायत 6 जबरदस्त फिल्म
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल