Guess Who : 2 डिवोर्स, 3 मुलं, घरात जावईही आला; वयाच्या साठीत तिसऱ्यांदा प्रेमात पडला सुपरस्टार, ओळखलं का?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
फोटोमध्ये शेतात बसलेल्या या मुलाला ओळखलं का? हा मुलगा सुपरस्टार आहे. दोन लग्न मोडल्यानंतर तो आता तिसऱ्या गर्लफ्रेंडसोबत रिलेशनमध्ये आहे.
advertisement
1/10

प्रेमाला वय, भाषा, जात किंवा धर्म असं कोणतंही बंधन नसतं. लोक कोणत्याही वयात प्रेमात पडतात. पण प्रेम खरं असलं पाहिजे आणि ते कोणाचाही विश्वासघात करत नाही हे कळणं महत्त्वाचं आहे. इंडस्ट्रीचा असाच एक सुपरस्टार जो वयाच्या 60व्या वर्षी प्रेमात पडला. पहिल्यांदा नाही तर तिसऱ्यांदा.
advertisement
2/10
हा अभिनेत्री प्रामुख्यानं हिंदी सिनेमात काम करतो. त्याने अनेक हिट सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. त्याची ऑनस्क्रिन कारकीर्दी नेहमीच यशाच्या शिखरावर होती पण ऑफस्क्रिन आयुष्य मात्र कधीच पूर्णपणे यशस्वी झालं नाही.
advertisement
3/10
या अभिनेत्याचं पहिलं लग्न झालं. पहिल्या बायकोवर त्यानं प्रचंड प्रेम केलं. तिच्यापासून दोन मुलं झाली. चौघांच्या चौकोनी कुटुंबात तो सुखी होता मात्र त्याच मन पालटलं अन् पहिला संसार मोडला.
advertisement
4/10
दोन मुलं असताना अभिनेत्याचं दुसरं लग्न केलं. त्याची दुसरी बायको बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती आहे. दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्याला एक मुलगा झाला. दुसऱ्या बायकोचा मुलगा मोठा होत नाही तोच त्याच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं.
advertisement
5/10
मोठ्या मुलीचं लग्न होण्याच्या काही वर्ष आधी अभिनेत्याचं दुसरं लग्न देखील मोडलं. आता तो वयाच्या 60 व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. त्याने त्याच्या दोन्ही बायकांना त्याच्या नव्या गर्लफ्रेंडशी ओळख करून दिली आहे.
advertisement
6/10
आपण बोलत आहोत तो बॉलिवूड सुपरस्टार म्हणजेच आमिर खान आहेत. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, "मी गौरी स्प्रेटसोबत दोन वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये आहे. माझ्या आयुष्याचा भाग असल्याबद्दल मी किरण राव आणि रीना दत्ताचा आभारी आहे."
advertisement
7/10
आमिर खानने 1986 मध्ये रीना दत्तासोबत लग्न केलं. दोघांना जुनैद खान आणि आयरा खान ही दोन मुले आहेत. आमिर खानने 2002 मध्ये रीना दत्तासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर 2005 साली त्याने दिग्दर्शक, निर्माती किरण रावशी लग्न केलं. दोघांना आझाद हा मुलगा आहे. लग्नाच्या 16 वर्षांनी आमिर खानने 2011 मध्ये डिवोर्स घेतला.
advertisement
8/10
60 वर्षीय आमिर खान गौरी स्प्राटच्या प्रेमात आहे. "60 व्या वर्षी प्रेमात पडणे ही अशी गोष्ट आहे जी कोणीही अपेक्षा करत नाही. मला वाटलं होतं की माझं पुन्हा कधीही कोणाशीही जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध राहणार नाहीत. पण गौरी स्प्राटने माझ्या आयुष्यात शांती आणली आहे. तिला भेटणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे", असं आमिर म्हणाला.
advertisement
9/10
तो असेही म्हणाला, "मी माझ्या एक्स पत्नी दयाळू आणि आदरणीय आहे. जरी आमचं लग्न संपलं असलं तरी मला अजूनही त्यांच्यासोबत राहायला आवडतं. त्यांनी माझ्या आयुष्यात खूप योगदान दिलं आहे. मी स्वतःइतकाच त्यांचा आदर करतो."
advertisement
10/10
"माझी पहिली पत्नी, रीना एक अद्भुत स्त्री आहे. आम्ही पती-पत्नी म्हणून वेगळे झालो. आम्ही मित्र आहोत. मला नेहमीच रीनाबद्दल प्रेम आणि आदर आहे. माझी दुसरी पत्नी, किरण राव तीही तशीच आहे. ती देखील एक उत्तम स्त्री आहे. आम्ही वेगळे झालो असलो तरी आम्ही अजूनही एक कुटुंब आहोत", असंही आमिर म्हणाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : 2 डिवोर्स, 3 मुलं, घरात जावईही आला; वयाच्या साठीत तिसऱ्यांदा प्रेमात पडला सुपरस्टार, ओळखलं का?