TRENDING:

Who is Baby Doll Archie : कोण आहे बेबी डॉल आर्ची? भारतापासून अमेरिकेपर्यंत चर्चा, प्रसिद्ध अडल्ट स्टारसोबतचा फोटो व्हायरल

Last Updated:
Who is Baby Doll Archie : सोशल मीडियाच्या जमान्यात कोणीही एका फोटो किंवा व्हिडिओमुळे रातोरात प्रसिद्ध होऊ शकतो. असंच काहीसं आसाममधील एका तरुणीसोबत घडलं. जी सध्या ‘बेबी डॉल आर्ची’ म्हणून चर्चेत आहे.
advertisement
1/7
कोण आहे बेबी डॉल आर्ची? भारतापासून अमेरिकेपर्यंत चर्चा, PHOTO VIRAL
सोशल मीडियाच्या जमान्यात कोणीही एका फोटो किंवा व्हिडिओमुळे रातोरात प्रसिद्ध होऊ शकतो. असंच काहीसं आसाममधील एका तरुणीसोबत घडलं. जी सध्या ‘बेबी डॉल आर्ची’ म्हणून चर्चेत आहे. ही नेमकी कोण आहे जी इंटरनेट सेन्सेशन बनली आहे?
advertisement
2/7
‘बेबी डॉल आर्ची’ म्हणजे अर्चिता फुकन. सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होणाऱ्या असाममधील या तरुणीविषयी जाणून घेऊया. ती नेमकी कोण आहे, काय करते, आणि कशामुळे चर्चेत आली? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/7
अर्चिता फुकन ही मूळची आसामची असून सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून काम करते. ती तिच्या स्टाईल, बोल्ड फोटोशूट्समुळे चर्चेत असते. सध्या तिचे इंस्टाग्रामवर 8.56 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती अनेक ट्रेंडिंग व्हिडिओ व फोटो शेअर करत असते.
advertisement
4/7
अर्चिता विशेष चर्चेत आली तेव्हा जेव्हा तिने प्रसिद्ध अॅडल्ट स्टार केंद्रा लस्ट सोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. एप्रिलमध्ये पोस्ट केलेला पहिला फोटो खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर तिने अजून एक फोटो शेअर केला, ज्यात दोघीही कॅज्युअल कपड्यांमध्ये एकत्र दिसत होत्या.
advertisement
5/7
या फोटोंमुळे अनेकांना आश्चर्य वाटलं आणि चर्चेला उधाण आलं. अनेकांनी अंदाज लावला की अर्चिता प्रौढ चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. मात्र अर्चिताने या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
advertisement
6/7
अर्चिता याआधीही एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली होती, जेव्हा रोमानियन गायिका केट लिनच्या ‘डेम उन ग्रर’ गाण्यावर तिने एक ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली होती.
advertisement
7/7
आज अर्चिता सोशल मीडियावर एक ओळख निर्माण करत आहे. तिच्या पोस्ट्समध्ये स्टाईल आणि ग्लॅमर दिसून येतो. ती नियमितपणे इंस्टाग्रामवर फॅशन, लाईफस्टाईल आणि ट्रेंडिंग व्हिडिओ शेअर करते. अर्चिताचा हा प्रवास एका सामान्य मुलीपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय होण्यापर्यंत पोहोचला आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या दररोज वाढत आहे आणि तिच्या प्रत्येक पोस्टकडे लक्ष वेधलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Who is Baby Doll Archie : कोण आहे बेबी डॉल आर्ची? भारतापासून अमेरिकेपर्यंत चर्चा, प्रसिद्ध अडल्ट स्टारसोबतचा फोटो व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल