TRENDING:

Vaibhav Sooryavanshi : प्रणित मोरेच्या शोमध्ये पोहोचला 14 वर्षांचा वैभव, कॉमेडियनने बाबर आझमचं नाव घेत घेतली शाळा!

Last Updated:

Vaibhav Sooryavanshi In pranit more show : भारत पाकिस्तान मॅचपूर्वी टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी प्रणित मोरेच्या स्टॅड अप कॉमिडी शोमध्ये पोहोचला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Vaibhav Sooryavanshi In pranit more show : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज टी-ट्वेंटी वर्ल्डकपमधील सामना खेळवला जाणार आहे. अशातच पाकिस्तानला अभिषेक शर्माच्या बॅटिंगने घाम फुटण्याची शक्यता आहे. तसेच अभिषेकपूर्वी आणखी एका खेळाडूने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. त्याचं नाव वैभव सूर्यवंशी... वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक खेळी करून टीम इंडियाला विजय मिळून दिला होता. अशातच आता वैभव सूर्यवंशी आजच्या मॅचपूर्वी एका शोमध्ये पोहोचला. हा शो होता प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे शोमध्ये...
Vaibhav Sooryavanshi Reach in pranit more show At Amaravati
Vaibhav Sooryavanshi Reach in pranit more show At Amaravati
advertisement

भैया मी तुमच्या शोमध्ये येऊ का?

महाराष्ट्राचा प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन आणि बिग बॉस फ्रेम प्रणित मोरे याचा अमरावतीमध्ये शो लागला होता. त्या शोआधी वैभव सूर्यवंशीने प्रणित मोरेला फोन केला अन् भैया मी तुमच्या शोमध्ये येऊ का? असा सवाल केला. त्यावर वैभवने एक अट देखील ठेवली. भैया तू माझी मस्करी करणार नसशील तरच मी येईल, असं वैभव म्हणाला. त्यावर प्रणित मोरेने पाकिस्तानची शाळा घेतली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

advertisement

वैभवची खरी अग्निपरीक्षा

वैभव सूर्यवंशी आता त्याची खरी परीक्षा देणार आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूरचा हा मुलगा 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सीबीएसई दहावीच्या परीक्षेला बसणार आहे. सीबीएसई बोर्डाने वैभव सूर्यवंशीचे प्रवेशपत्र जारी केले आहे. वैभवसाठी ही अग्निपरीक्षा असेल. त्यामुळे परीक्षेच्या आधी वैभव सूर्यवंशीने मन हलकं होण्यासाठी कॉमेडी शोमध्ये हजेरी लावणं पसंत केलं.

advertisement

परीक्षा केंद्रावर व्हीआयपी वागणूक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मालामाल करणारी रताळी शेती, 5 एकरांत 750 क्विंटल उत्पादन, शेतकऱ्याला 8 लाख नफा
सर्व पहा

दरम्यान, क्रिकेट आणि शिक्षण संतुलित करणं हे वैभव सूर्यवंशीसाठी एक मोठं आव्हान असेल, कारण 26 मार्चपासून आयपीएल सामने देखील सुरू होणार आहेत. वैभव सूर्यवंशीने परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे. वैभव सूर्यवंशीला परीक्षा केंद्रावर व्हीआयपी वागणूक मिळेल का? असा सवाल देखील विचारला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Sooryavanshi : प्रणित मोरेच्या शोमध्ये पोहोचला 14 वर्षांचा वैभव, कॉमेडियनने बाबर आझमचं नाव घेत घेतली शाळा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल