TRENDING:

Weather Alert: राज्यात ऐन थंडीत पावसाचा अलर्ट, कल्याण-डोंबिवलीत आज कसं असेल हवामान?

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असतानाच कल्याण-डोंबिवलीत देखील हवापालट झाल्याचे चित्र आहे. 13 जानेवारीचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5
राज्यात ऐन थंडीत पावसाचा अलर्ट, कल्याण-डोंबिवलीत आज कसं असेल हवामान?
बंगालच्या उपसागरांतील हवामान प्रणाली आणि उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरी यांमुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. काही भागात ऐन थंडीत पाऊस पडत असून काही ठिकाणी गारठा वाढला आहे. ठाणे मुंबई परिसरातील देखील हवापालट झाल्याचे चित्र आहे. मंगळवारी कल्याण-डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
महाराष्ट्रात उत्तर भारतातून येणाऱ्या थंडीच्या लाटांमुळे गारठा वाढून किमान तापमानात घट झाली आहे,तसेच काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि वाऱ्याची शक्यता असल्याने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यात थंडी कायम राहणार .यावरून 13जानेवारी कल्याण डोंबिवली हवामानाची स्थिती जाणुन घेऊयात?
advertisement
3/5
कल्याण तालुक्यात हवामान स्वच्छ आणि आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून हवामान स्थिर असून किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर कमाल 33 अंश सेल्सिअस राहील. दिवसा ऊन आणि स्वच्छ आकाश, तर सकाळ-संध्याकाळ ढगाळ वातावरण किंवा हलके धुके राहील. या काळात गारवा जाणवेल.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान स्वच्छ किंवा अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल 30अं श अंश सेल्सिअस राहील. दिवसा ऊबदार हवा आणि रात्री गारठा जाणवेल. हवामानातील बदलांमुळे पुढील काही दिवस आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
5/5
बदलापूरमध्ये हवामान ढगाळ आणि थंड राहण्याची शक्यता असून, दिवसा तापमान 25 ते 30 अंश असेल तर रात्री पारा खाली घसरून 20 अंश सेल्सिअस असेल. शहापूर, मुरबाडमध्ये ढगाळ हवामान राहील. किमान तापमान 26 अंश तर कमाल 32 अंश सेल्सिअस असेल. सकाळची हवा चांगली असली तरी प्रदूषण वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: राज्यात ऐन थंडीत पावसाचा अलर्ट, कल्याण-डोंबिवलीत आज कसं असेल हवामान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल